आजच्या या लेखा मध्ये आपण जमीन हद्द मोजणी कशी करायची, जमीन हद्द मोजणी या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तुम्ही जमिनीची हद्द मोजणी करून तुमची जमीन कायम करू शकतात. जमनीची शासकीय पद्धतीने हद्द मोजणी करण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो. तो अर्ज तुम्ही भूमी अभिलेख कार्यालयात जमा करायचा असतो. या विषयी संपूर्ण माहिती आपण आता पाहत आहोत.
तुम्ही लेख वाचत असणारे बरेच जण शेतकरी आहोत, शेतकरी आणि शेती व्यवसाय म्हणलं की शेतकऱ्याचा बांध आलाच आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे बंधासाठी तसेच भांडणे होत असतात. बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेजारील शेतकऱ्याने जमिनीवर थोडे फार अतिक्रमण केले असते, किंवा तो शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतात अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांमध्ये भांडणे होत असतात. त्यावेळी जर तुमच्या शेत जमिनीवर अतिक्रमण झाल्यास तुम्ही तुमच्या जमिनीची हद्द मोजणी करून घेऊ शकतात. त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकतात.
हे नक्की वाचा:- सण १९८० पासूनचे जुने सातबारा उतारा व फेरफार पहा आता ऑनलाईन फक्त २ मिनटात
तर यामुळे शेतकऱ्यांची भांडणे होऊ नये, प्रत्येक शेतकऱ्याला त्याची जमीन मिळावी या साठी एक उपाय हा सरकारच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे. भूमी व अभिलेख च्या मदतीने सरकारी पद्धतीने तुम्ही तुमच्या जमिनीची सरकारी मोजणी करून हद्द कायम करू शकतात.
जमीन हद्द मोजणी कशी करायची:-
जर तुम्हाला तुमच्या जमिनीची हद्द मोजणी करायची असेत तर तुम्हाला अर्ज करावा लागतो. अर्ज हा तुम्हाला या लेख संपल्यानंतर या लेखाच्या शेवटी आम्ही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
हे नक्की वाचा:- जमीन नावावर करण्यासाठी लागणार आता फक्त १०० रुपये
जमीन खरेदी मोजणी करण्यासाठी करावयाचा अर्ज हा तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्या नंतर अर्ज हा व्यवस्थित रित्या भरून तो अर्ज तुम्हा भूमी व अभिलेख कार्यालयात जमा करायचा आहे.
भूमी व अभिलेख विभागातील उपअधीक्षक यांच्याकडे हा अर्ज तुम्हाला जमा करावा लागतो.
आपल्याला आपल्या जमिनीची मोजणी करायची असेल तर आपल्याला जमीन हद्द मोजणी करून घेण्या संबंधी महाराष्ट्र जमीन अधिनियम १९६६ कलम १३६ अशी कायदेशीर तरतूद केलेली आहे. जर तुम्हाला तुमच्या जमिनीचे क्षेत्र हे कमी आहे अशे वाटत असेल तर तुम्ही भूमी अभिलेख विभागात जमीन मोजणी अर्ज करू शकतात. तुम्ही तुमची जमीन मोजणी करण्यासाठी मोजणीचा अर्ज सादर केल्यानंतर मोजणी अर्जाला मोजणी रजिस्टर नंबर हा देण्यात येत असतो.
जमीन मोजणी करण्यासाठी करावयाचा अर्ज भरत असताना तो अर्ज हा अचूक रित्या, योग्य माहिती त्या अर्जामध्ये भरून जमा करावा लागतो.(जमिनीची शासकीय मोजणी)
जमीन मोजणी प्रोसेस कशी असते:-
तुमच्या जमिनीची मोजणी म्हणजेच हद्द कायम करत असताना आपल्या जमीन क्षेत्राचे सर्व मुळ नकाशे तसेच इतर रेकॉर्ड हे काढण्यात येत असून ते संबधित प्रकरणास जोडले जातात. जर कधी कधी मूळ दस्त ऐवज उपलब्ध नसेल तर गाव नकाशा चा आधार घेऊन जमिनीची हद्द कायम करून देण्यात येत असते.
भूमी अभिलेख विभागात ज्या शेतकऱ्याने अर्ज केला आहे त्या शेतकऱ्याला तसेच त्यांच्या क्षेत्राला लागून असलेल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना १५ दिवस आगोदर नोटीस पाठविण्यात येते. जो शेतकरी भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज करतो तो फी पेड करत असतो.
जमीन हद्द मोजणी अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
भूमी अभिलेख कार्यालय मार्फत देण्यात आलेल्या नोटीसमध्ये दिलेल्या तारखेवर शेतकऱ्याच्या जमिनीच्या सर्व नंबर किंवा गट नंबर च्या साहाय्याने शेतकऱ्यास मोजणी करून खुणा टाकून अर्जदार शेतकऱ्यास त्याची हद्द कायम करून दिली जाते. उपस्थित लोकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. जमिनीची मोजणी करताना दर्शविलेल्या खुणा मान्य असेल नसेल तर त्याची नोंद हि पंचनामा मध्ये केली जाते. जमिनीची मोजणी झाल्यानंतर ते मोजणी झालेले प्रकरण भूमी अभिलेख कार्यालय नोंद करून कार्यालयामध्ये जमा केले जाते. जमिनीची मोजणी झाल्यानंतर
मोजणी जर मान्य असेल तर काही दिवसानंतर हद्द कायम नकाशा ची प्रत हि अर्जदारास देऊन ते प्रकरण करण्यात येत असते. जर ही करण्यात आलेली मोजणी मान्य नसल्यास त्या जमिनीची परत मोजणी ही करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.