पीक विमा तक्रार निवारण कसे करायचे | पीक विमा क्लेम कसा करायचा | pik vima claim online, Crop Insurance claim

प्रधान मंत्री पीक विमा योजना अंतर्गत शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतातील पिकांसाठी येणाऱ्या धोक्यापासून संरक्षण देण्यासाठी एक विमा कवच हे शेतकऱ्याच्या शेतीतील शेत मालाला पुरविते. प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे. या pradhanmantri pik vima yojana मध्ये शेतकऱ्याला त्यांच्या हीस्याची काही रक्कम भरावी लागते. ती रक्कम भरल्या नंतर शेतकऱ्याचा पीक विमा योजना चा अर्ज हा सादर होतो. त्यानंतर केंद्र सरकार तसेच राज्य सरकार त्यांच्या हिस्यावर येणारी पीक विमा ची रक्कम विमा कंपनीस मंजूर करून त्यांना देत असतात. त्यानंतर जर चालू वर्षात जर शेतकऱ्याच्या पिकावर संकट आले त्यांच्या शेत पिकाला धोका निर्माण झाला तर अशा वेळेस शेती पीक खराब होते त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते.

पीक विमा तक्रार निवारण कसे करायचे | पीक विमा क्लेम कसा करायचा | pik vima claim online, Crop Insurance claim

 

अशा वेळी शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतीतील पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळविण्यासाठी पीक विमा कंपनीकडे pik vima claim पीक विमा नुकसानीचा दावा हा करावा लागतो. हा pik vima claim नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आत करावा लागत असतो. पीक विमा क्लेम केल्या नंतर विमा कंपनीचे प्रतिनिधी प्रत्यक्ष तुमच्या शेतीमध्ये येऊन पाहणी करतील आणि त्यानंतर तुम्ही केलेल्या pik vima claim ला मंजूर करून तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विमा नुकसानीची रक्कम ही हस्तांतरित करत असतात.

हे नक्की वाचा:- फळ पीक विमा योजना यादी जाहीर

परंतु pik vima claim करणे बऱ्याच शेतकरी बांधवांना जमत नाही. त्यांना पीक विमा क्लेम हा करता येत नाही. काही जणांकडे अँड्रॉइड मोबाईल नसतो, तर काही शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीचा मोबाईल नंबर सापडत नाही. अश्या बऱ्याच कारणामुळे शेतकरी पीक विमा क्लेम करू शकत नाही. आणि हा पीक विमा योजना क्लेम नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आत करणे गरजेचे असते. तेव्हाच पीक विमा मंजूर होतो. Crop Insurance claim

 

 

पीक विमा योजना क्लेम कसा करायचा:-

या लेखात आपण पीक विमा क्लेम(Crop Insurance claim) करण्याच्या सोप्या पद्धती पाहणार आहोत, ज्या प्रत्येक शेतकऱ्याला समजतील. ज्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसेल, ज्यांनी बँकेत ऑफलाईन पद्धतीने पीक विमा भरला असेल, ज्यांनी स्वतः पीक विमा भरला असेल किंवा csc centre वरून पीक भरला असेल अशा प्रत्येक शेतकऱ्याने पीक विमा योजना क्लेम कसा करायचा ही माहिती तुम्हाला आम्ही सांगणार आहोत.

 

 

 

पीक विमा क्लेम करण्याच्या विविध पद्धती( How to make crop insurance claim ):-

तुम्ही तुमच्या शेती पिकाचा पीक विमा काढला असल्यास तुम्ही खालील प्रमाणे पीक विमा क्लेम करू शकतात.

हे नक्की वाचा:- जमीन नावावर होणार आता फक्त १०० रुपयात

१)क्रॉप इन्शुरन्स ॲप (Crop Insurance App):-

Crop Insurance App च्या साहाय्याने तुम्ही pik vima claim हा ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईल च्या साहाय्याने करू शकतात. यासाठी तुम्हाला गूगल प्ले स्टोअर वरून Crop Insurance नावाचे एक मोबाईल app हे डाऊनलोड करावे लागेल, हे अँप डाऊनलोड केल्या नंतर तुम्ही तुमच्या पीक विम्याचा अर्ज केल्याचा नंबर टाकून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या crop insurance app मध्ये pik vima claim करताना तुम्ही तुमच्या शेतात नुकसान झाल्याचा फोटो तसेच व्हिडिओ सुद्धा अपलोड करू शकतात. पीक विमा क्लेम केल्या नंतर तुम्हाला एक docket id मिळतो. तो तुम्ही जपून ठेवावा. या docket id च्या साहाय्याने तुम्ही तुमच्या पीक विमा क्लेम चे स्टेटस चेक करू शकतात.

 

२)विमा कंपनी टोल फ्री क्रमांक:-

पीक विमा क्लेम करण्याची ही पद्धत एकदम सोप्पी आहे, ही पद्धत प्रत्येक शेतकऱ्याला समजेल, तुम्ही अर्ज केल्याच्या पीक विमा पावती वर तुम्हाला पीक विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक मिळेल त्या नंबर वर call संपर्क करून तुम्ही पीक विमा नुकसानीची माहिती देऊन पीक विमा क्लेम करू शकतात. यामध्ये सुद्धा तुम्हाला पीक विमा क्लेम केल्याचा नंबर देण्यात येत असतो.

हे नक्की वाचा:- पशू संवर्धन विभाग गाई म्हशी शेळी मेंढी पालन अनुदान योजना सुरू

३)विमा कंपनीचा ई-मेल :-

पीक विमा क्लेम करण्यासाठी तुम्ही पीक विमा कंपनीला ईमेल सुद्धा करू शकतात.

 

 

४)विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय:-

जर एकाद्यां शेतकऱ्याला कोणत्याच पद्धतीने पीक विमा क्लेम करता येत नसेल तर तो शेतकरी स्वतः विमा कंपनीच्या तालुकास्तरीय कार्यालयाला भेट देऊन पीक विमा क्लेम करू शकतो.

 

 

५)कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी कार्यालय:-

पीक विमा योजना क्लेम करण्यासाठी तुम्ही कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क करून सुद्धा पीक विमा नुकसान झाल्याची माहिती देऊ शकतात.

हे नक्की वाचा:- शेळी पालन शेड अनुदान योजना

 

६)ज्या बँकेत विमा भरला ती बँक शाखा:-

जर शेतकऱ्याने त्यांचा पीक विमा हा बँकेत विमा जमा केला असेल तर तो शेतकरी पीक विमा क्लेम करण्यासाठी त्या बँकेत जाऊन पीक विमा नुकसानीची माहिती देऊन पीक विमा क्लेम हा करू शकतो.

 

या पैकी कोणत्याही एका पद्धतीने तुम्ही तुमच्या शेतात झालेल्या पीक नुकसानीची माहिती तुमच्या विमा कंपनीस देऊन पीक विमा क्लेम करू शकतात.

 

ही माहिती महत्वपूर्ण वाटल्यास तुमच्या सर्व मित्रांना शेअर करायला विसरू नका.