Maha dbt scholarship अर्ज सुरू | maha dbt scholarship application started 2021-22

महा डीबीटी(maha-DBT scholarship) काय आहे:-

शाळेत किंवा कॉलेज मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे स्कॉलरशिप ही देण्यात येत असते. या मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप चा समावेश होत असते. त्याच प्रमाणे तुम्ही शिकत असलेल्या कोर्स नुसार देखील तुम्हाला आपल्या महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत शिष्यवृत्ती देण्यात येत असते. आणि या वर्षी चे स्कॉलरशिप साठीचे ऑनलाईन अर्ज हे सुरू झालेले आहेत. आजच्या या लेखा मध्ये आपण mahadbt scholarship विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.MAHADBT scholarship scheme 21-22,MAHADBT PORTAL वर शिष्यवृत्ती साठी अर्ज सुरु

 

Maha dbt scholarship अर्ज सुरू | maha dbt scholarship application started 2021-22,MAHADBT PORTAL

 

महा डीबीटी(maha-DBT scholarship) अंतर्गत लाभ कोणाला मिळू शकतो:-

Maha dbt scholarship अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील शिक्षण शिकत असलेल्या मुलांचा शैक्षणिक विकास व्हावा, या मुलांना त्यांचा शिक्षणासाठी लागणारा खर्च हा त्यांना स्कॉलरशिप देऊन काही प्रमाणात आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप च्या रूपाने मदत करण्यात येत असते.

या mahadbt scholarship योजने अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्गीय व विमाप्र या प्रवर्गातील आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने scholarship देण्यात येत असते. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च तसेच चांगले शिक्षण हे घेता आले पाहिजे हा उद्देश समोर ठेवून या प्रवर्गत मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या स्कॉलरशिप ह्या देण्यात येत असतात.
MAHADBT PORTAL वर शिष्यवृत्तीसाठी अर्ज सुरु

महा डीबीटी(maha-DBT scholarship) साठी अर्ज कसा करायचा:-

महा डी बी टी स्कॉलरशिप मध्ये अनेक प्रकारच्या स्कॉलरशिप साठी आपल्याला अर्ज हा करता येतो. या मध्ये भारत सरकार शिष्यवृत्ती अशा अनेक स्कॉलरशिप च्या योजना आहे आणि या सर्व योजना साठी आपल्याला maha dbt scholarship portal वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागतो.GOIS

या वर्षी सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता महाराष्ट्र शासनाच्या महा.डी.बी.टी पोर्टल (Maha Dbt portal) वर सुरु  झाले आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांनी अजून maha dbt portal महा.डी.बी.टी पोर्टल वर अर्ज केला नसेल त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट:- https://mahadbtmahait.gov.in

महा डी बी टी स्कॉलरशिप (maha dbt scholarship) लागणारी कागदपत्रे:- documents for maha dbt scholarship:-

महा डी बी टी स्कॉलरशिप साठी खालील कागदपत्रे लागतात.

१) आधार कार्ड
२) मार्कशिट
३) बँक अकाऊंट
४) उत्पन दाखला
५) जातीचा दाखला
६) अधिवास प्रमाणपत्र
७) बँक अकाऊंट आधार कार्ड सोबत लिंक पावती
८) रेशन कार्ड
९) ऍडमिशन पावती

इत्यादी कागदपत्रे तुम्हाला maha dbt scholarship अर्ज करण्यासाठी लागतात.

 

महा डी बी टी स्कॉलरशिप (maha dbt scholarship) ऑनलाईन अर्ज केल्या नंतर काय करावे:-

Maha dbt scholarship portal वर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्या नंतर तुम्हाला त्या स्कॉलरशिप च्या अर्जाची प्रिंट काढायची आहे. व तुम्हाला आवश्यक ती सर्व कागदपत्रे त्या प्रिंट सोबत जोडून तुमच्या महाविद्यालयात जमा करावी लागते. त्या नंतर तुमचे महाविद्यालय तुमचा अर्ज छाननी करण्यात येतो. नंतर हा अर्ज महाविद्यालय समाज कल्याण आयुक्त विभागाकडे पाठविण्यात येतो.

त्या नंतर तुम्हाला स्कॉलरशिप ही तुमच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येत असते. ही स्कॉलरशिप तुम्हाला पहिल्या टप्यात किंवा दोन टप्पे मिळून देण्यात येईल. भारत सरकार शिष्यवृत्ती (GOIS),MAHADBT scholarship scheme 2021

अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्याकरिता सामाजिक न्याय विभाग व विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत करुन हा अर्ज आपल्या संबंधित महाविद्यालयाकडून तपासून व पडताळणी करुन  महाविद्यालयात सादर करावयाचा आहे.

वर्ष २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ३१ जानेवारी, २०२२ पर्यंत अर्ज करावा लागेल. सध्या हीच अंतिम तारीख आहे