गारपीट व अवेळी पाऊस नुकसान भरपाई निधी मंजूर|Garpit Nuksan bharpai 2021

गारपीट व अवेळी पाऊस नुकसान भरपाई निधी मंजूर|Garpit Nuksan bharpai 2021  मित्रांनो महाराष्ट्र राज्यात 2020 मध्ये फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे या महिन्यात या कालावधीत गारपीट व अवेळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे अत्यंत नुकसान झाले होते.त्यामुळे गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीतील पिकाच्या नुकसानीपोटी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्यात येणार असून करण्याबाबतचा नवीन शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.(Garpit-Aveli-Paus-Nuksan-bharpai-Farmers)

गारपीट व अवेळी पाऊस नुकसान भरपाई निधी मंजूर nuksan bharpai Maharashtra Farmers, गारपीट नुकसान भरपाई २०२०
गारपीट व अवेळी पाऊस नुकसान भरपाई निधी मंजूर

 

 

महाराष्ट्र राज्यात डिसेंबर 2019 ते जानेवारी 2020 या कालावधी मध्ये गारपीट व अवेळी पाऊस झाला होता त्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे हे तलाठी,तहसीलदार,कृषी अधिकारी यांच्या मार्फत करण्यात आले होते.संबंधीत संयुक्त पंचनामे झाल्यानांतर 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.नुकसान भरपाई रक्कम वितरीत प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राबविण्यात येत आहे.आणि नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचा बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यात येणार आहे.(Nuksan bharpai list 2020 maharashtra)

 

महाराष्ट्रात फेब्रुवारी ते मे या महिन्यात 2020 या कालावधीत राज्यात झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले होते त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.आणि आता प्रत्येक जिल्ह्यासाठी निधी मंजूर झाला आहे.(Garpit Aveli Paus Nuksan bharpai Farmers)

 

शेतकऱ्यांना नुकसा भरपाई चे वाटप करताना खालील दक्षता घेण्यात येणार आहे:-

 

i) ज्या शेतकऱ्यांचे नुकसान ३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झाले त्यांनाच नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

 

ii) नुकसान झाल्यानंतर कृषी सहायक, तलाठी व ग्राम सेवक यांच्या मार्फत पंचनामे करण्यात आले होते त्या पंचनाम्यानुसार बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप जिल्हाधिकारी यांच्या मार्फत करणार आहे .

 

iii) ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते अशा बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

 

iv) नुकसान झालेल्या कोणत्याही शेतकऱ्यांना रोखीने किंवा निविष्ठा स्वरुपात मदत मिळणार नाही.त्यांच्या बँक अकाउंट ला मदतीची रक्कम जमा होईल.

 

v)शेतकऱ्यांना जी मदतीची रक्कम मिळणार आहे त्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीच्या रक्कमेमधून बँकेला कोणत्याही प्रकारची वसुली करता येणार नाही.खातेदारांच्या बँक खात्यावर थेट रक्कम जमा करताना बँक मदतीचे मिळालेले पैसे कपात करू शकत नाही.

 

सर्व लाभार्थ्याना शासना तर्फे मिळणारी मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर संबंधीत सर्व लाभार्थ्यांची यादी व त्यांना मिळालेला मदतीचा तपशील सर्व जिल्ह्यांच्या वेबसाईट वर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

 

नुकसान भरपाई जिल्हा नुसार रक्कम यादी गारपीट व अवेळी पाऊस नुकसान भरपाई निधी मंजूर
नुकसान भरपाई जिल्हा नुसार रक्कम यादी

 

 

सर्व जिल्ह्यात ही नुकसान भरपाई ची रक्कम मान्य केली असून महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यात येणार आहे.आणि लाभार्थ्यांची यादी ही जिल्ह्याच्या वेबसाइट वर अपलोड करण्यात येणार आहे.

अधिक माहिती हवी असल्यास इथे क्लिक करा आणि संबंधीत शासन निर्णय पहा.

 

गारपीट व अवेळी पाऊस नुकसान भरपाई याद्या जाहीर झालेल्या आहेत. त्या याद्या आपण आपल्या वेबसाईट वर उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

मित्रांनो अशा करतो की,तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास नक्की शेअर करा.

 

हे सुध्दा वाचा:- शरद पवार ग्राम समृद्धी योजना सुरू 

हे सुध्दा वाचा:-  महा डी बी टी योजनांची लॉटरी लागली संपूर्ण माहिती 

Leave a Comment