मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात महाडीबीटी शेतकरी पोर्टलच्या अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्र राबविण्यात येत आहे. या Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेती संबंधित विविध कृषी अवजारे व कृषी यंत्र व कृषी साहित्य खरेदी करण्याकरिता अनुदान वितरित करण्यात येत आहे. कृषी यांत्रिकीकरण योजना आपल्या महाराष्ट्र राज्यात सुरू असून या योजनेअंतर्गत नवीन अर्ज सुरू झालेले आहेत. कृषी यांत्रिकीकरण योजनेबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत.
कृषी यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्र अर्ज सुरू; अर्ज प्रक्रिया ऑनलाईन | Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra 2022 |
कृषी यांत्रिकीकरण योजना Krushi Yantrikikaan Yojana Maharashtra
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या महाराष्ट्र राज्यात शेतकरी हा आधुनिक शेतीकडे वळावा त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना शेतातील पीक घेण्याकरिता येणारा खर्च कमी व्हावा म्हणजेच शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अवजारांचा व यंत्रांचा वापर करून खर्च कमी करून जास्त उत्पन्न मिळवावे या उद्देशाने ही महत्त्वपूर्ण अशी कृषी यंत्र व अवजारांवर सबसिडी पुरविणारी कृषी यांत्रिकीकरण योजना(Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra 2022) सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना विविध यंत्र व आजारांवर सबसिडी देण्यात येत असल्यामुळे शेतकरी ते यंत्र व अवजारे खरेदी करतात व त्याचा वापर आपल्या शेतामध्ये करून स्वतःची आर्थिक प्रगती साध्य करू शकतात. या योजनेचा लाभ महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर देण्यात येत आहे. ही योजना शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळविणारी महत्त्वपूर्ण अशी योजना आहे.
कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत खालील यंत्र व अवजारांवर सबसिडी मिळते Krushi Yantrikikaran Yojana 2022 Maharashtra
शेतकरी मित्रांनो कृषी यांत्रिकीकरण योजना(Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra 2022) अंतर्गत शेतकरी बांधवांना खालील शेती उपयोगी यंत्र व अवजारे खरेदी करण्याकरिता अनुदान वितरित करण्यात येत आहे. खालील यंत्र व आजारांवर महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत सबसिडी मिळते.
1. ट्रॅक्टर
2. पावर टिलर
3. ट्रॅक्टर चलीत अवजारे
4. पॉवर टिलर चलीत अवजारे
5. स्वयंचलित अवजारे
6. फलोत्पादन यंत्र व अवजारे
7. वैशिष्ट्यपूर्ण यंत्र व अवजारे
8. काढणी पश्चात तंत्रज्ञान
9. प्रक्रिया संच
Krushi Yantrikikaran Yojana अंतर्गत वरील यंत्र व अवजारांकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनुदान पुरविण्यात येत आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत वरीलपैकी कोणत्याही घटकांतर्गत आपण लाभ मिळवू शकतो.
महत्वाचं अपडेट:- खरीप पिक विम्याचे हेक्टरी 9 हजार रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा.
या योजनेअंतर्गत पात्रता
कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत लाभ मिळवून देण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने काही पात्रता ठरवून दिलेल्या आहेत. जर आपण त्या पात्रतांची पूर्तता करणार असाल तरच आपल्याला Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra अंतर्गत लाभ मिळवता येतो.
1. अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःचे आधार कार्ड असावे
2. शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा सातबारा व आठ अ उतारा असावा
3. फक्त एकाच अवजाराकरिता अनुदान देय राहील जसे की ट्रॅक्टर घ्या किंवा मग यंत्र किंवा अवजारे
4. जर अर्जदार हा अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असेल तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे
5. जर तुम्हाला ट्रॅक्टरचलित अवजारांचा लाभ मिळवायचा असेल तर तुमच्या नावावर किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर ट्रॅक्टर असावा लागतो. त्याकरिता ट्रॅक्टरची कागदपत्रे जोडावी लागतात
6. एखाद्या घटकाचा म्हणजेच जसे की ट्रॅक्टर किंवा ट्रॅक्टरचलित अवजारे किंवा या योजनेअंतर्गत कोणत्याही योजनेचा लाभ मिळवल्यास त्याच घटकाकरिता किंवा अवजाराकरिता पुढील दहा वर्ष पुन्हा अर्ज करता येणार नाही.
अशाप्रकारे पात्रता या कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत ठरवून दिलेल्या आहेत. जर तुम्हाला सुद्धा कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंतर्गत कोणत्याही घटकाचा लाभ मिळवायचा असेल तर वरील सर्व बाबींची पूर्तता तुम्ही करायला पाहिजे.
कृषी यांत्रिकीकरण योजना लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
शेतकरी मित्रांनो कृषी यांत्रिकीकरण योजना(Krushi Yantrikikaan Yojana) ही महत्त्वपूर्ण अशी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्याकरिता आपल्याला खालील कागदपत्रे ऑनलाईन सादर करावी लागतात त्यांची यादी दिलेली आहे.
1. शेतकऱ्याचे आधार कार्ड
2. शेतकऱ्यांच्या जमिनीचा सातबारा व आठ अ
3. योजनेअंतर्गत ज्या आजारांची किंवा यंत्रांची खरेदी केलेली आहे त्यांचे कोटेशन तसेच तपासणी संस्थेने दिलेल्या तपासणी अहवाल
4. कास्ट सर्टिफिकेट
5. पूर्वसंमती पत्र
6. स्वघोषणापत्र
का सर्टिफिकेट हे केवळ अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या प्रवर्गातील व्यक्तींना अपलोड करावे लागते. जर तुम्ही सर्वसाधारण प्रवर्गातून अर्ज केला तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
हे नक्की वाचा:- नुकसान भरपाई च्या नवीन याद्या जाहीर; आत्ताच डाऊनलोड करा
कृषी यांत्रिकीकरण योजना ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
शेतकरी मित्रांनो कृषी यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्र(Krushi Yantrikikaan Yojana Maharashtra 2022) अंतर्गत लाभ मिळवण्याकरिता आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याच्या स्टेप खाली दिलेल्या आहेत त्या फॉलो करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करून घ्या.
1. सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर जा.
2. महाडीबीटी शेतकरी पोर्टलची लिंक आम्ही खाली तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे.
3. त्या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला तुमची नोंदणी करायची आहे त्याकरिता नवीन नोंदणी करा या ऑप्शन वर क्लिक करा.
4. आता नोंदणी केल्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड तयार करून घ्या आता तुम्हाला लॉगिन करायचे आहे त्याकरिता तुम्ही युजर आयडी आणि पासवर्ड किंवा आधार कार्ड नंबर टाकून ओटीपी च्या सहाय्याने लॉगिन करून घ्या.
5. आता अर्ज करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्यासमोर विविध योजना आहे त्यापैकी कृषी यांत्रिकीकरण योजना या पर्यायावर क्लिक करा.
6. आता तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत ज्या यंत्र किंवा अवजारांकरिता अर्ज करायचा आहे ते निवडून घ्या आणि अर्जाचा फॉर्म व्यवस्थितपणे भरून अर्ज सबमिट करा.
7. अर्ज सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होईल.
येथे क्लिक करुन ऑनलाईन अर्ज करा–
कृषी यांत्रिकीकरण योजना लाभार्थ्याची निवड
शेतकरी मित्रांनो वरील प्रमाणे कृषी यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्र(krushi Yantrikikaran Yojana Yadi Maharashtra) अंतर्गत महाडीबीटी शेतकरी पोर्टलच्या अंतर्गत ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तुमचा अर्ज हा छाननीअंतर्गत मध्ये जातो. म्हणजेच तुम्ही केलेला अर्ज चेक करण्यात येतो त्याची छाननी करण्यात येते त्यानंतर जास्त अर्ज प्राप्त झाल्यास महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकरी योजनांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येते. शेतकरी योजनांची लॉटरी लागल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे नाव त्यामध्ये आलेले आहे त्यांना त्या घटकाकरिता लाभ देण्यात येतो. जर कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या लॉटरीमध्ये तुमची निवड झाल्यास तुम्हाला एसएमएस प्राप्त होतो त्यानंतर तुम्हाला पोर्टलवर लॉगिन करून योजनेसंबंधी सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागतात. त्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी येऊन पाहणी करतात सर्व बिल आणि कागदपत्रे बरोबर असल्यास अनुदान मागणी करावी त्यानंतर शासनाच्या वतीने तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा करण्यात येते.
कृषी यांत्रिकीकरण योजना संबंधित ही माहिती तुम्हाला आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.