रब्बी हंगामातील पिक विमा एक रुपयात या तारखेपर्यंत काढता येणार विमा, शेवटी ची तारीख कोणती? | Rabi Pick Insurance

राज्यशासना अंतर्गत राज्यांमध्ये एक रुपयात पिक विमा योजना चालू करण्यात आलेले आहे, यावर्षी खरीप हंगामामध्ये अनेक शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेतला, तसेच रब्बी हंगामामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना फक्त एक रुपयांमध्ये रब्बी पिक विमा काढता येणार आहे. एरवी जी शेतकरी हिस्सा रक्कम भरावी लागत होती ती रक्कम शेतकऱ्यांना न भरता राज्य शासना अंतर्गत भरली जाणार आहे.

रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना रब्बी पिक विमा संबंधित विमा भरण्याच्या तारखेपर्यंत भरता येईल परंतु त्यानंतर शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा योजनेत सहभाग म्हणून येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा, रब्बी कांदा तसेच बागायत गव्हासाठी 15 डिसेंबर या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान पिक विम्याच्या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन विमा काढता येणार आहे.

शेतकऱ्यांना नोव्हेंबर अखेरला ज्वारी तर 31 मार्च 2024 पर्यंत भुईमुग व उन्हाळी भात या पिकासाठी वीमा 1 रूपयात काढता येणार आहे. त्यामूळे शेतकऱ्यांनी 1 रुपया व्यतिरिक्त जास्त रुपये न देता विमा काढावा.कारण खरीप हंगामामध्ये CSC सेंटर अथवा ज्या ठिकाणावरून शेतकऱ्यांनी विमा अर्ज काढला अश्या ठिकाणी शेतकऱ्यांकडे 1 रुपया व्यतिरिक्त पैश्याची मागणी केली जात होती. अशा वेळेस शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात लूट केली जात होती.

एक रुपयापेक्षा जास्त पैसे न देता शेतकऱ्यांनी पिक विमा काढावा तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवावा अशा प्रकारचे आवाहन कृषी विभागांतर्गत करण्यात आलेले आहे.

रब्बी हंगामातील पिक विमा एक रुपयात या तारखेपर्यंत काढता येणार विमा, शेवटी ची तारीख कोणती? | Rabi Pick Insurance

राज्यातील या रेशन कार्ड धारकांना मिळणार एक साडी मोफत