शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे, प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते, व अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी ची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, शासनांतर्गत अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात, अशा प्रकारची शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली योजना म्हणजेच प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना. प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते.
प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सेल्फ सर्वे करण्याचे मेसेज देण्यात आलेले आहे, लाभार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने सेल्फ सर्वे करायचा आहे व सेल्फ सर्वे कशा पद्धतीने करायचा हा प्रश्न अर्थातच पडलेला असेल, सेल्फ सर्वे करण्यासाठी कोणत्याही प्रकारे जास्त प्रोसेस करावी लागत नाही ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण प्रोसेस लाभार्थ्याला पूर्ण करावी लागेल. त्यासाठी मोबाईल वरून महाऊर्जेच्या मेडा नावाचा ॲप प्ले स्टोर वरून लाभार्थ्याला डाऊनलोड करावा लागेल.
कुसुम ब च्या लाभार्थ्यांना सेल्फ सर्वे करण्याचे मेसेज देण्यात आलेले आहे व त्यांना सर्वे करावा लागणार आहे, तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सर्व माहिती www.mahaurja.com या संकेतस्थळावर सुद्धा लाभार्थ्याला उपलब्ध होईल. सोलार पंप योजने अंतर्गत शेतकऱ्यांकडे जर 2.5 एकर क्षेत्र असेल तर 3 HP पंपाची मागणी करता येते, तसेच जर 5 एकर क्षेत्र असेल तर त्यासाठी 5 HP तसेच त्यावरून अधिक क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्याला 7.5 HP DC पंपाची मागणी करता येते,
कुसुम सोलर साठी काही आवश्यक कागदपत्र लागतात त्यामध्ये सातबारा उतारा, भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रुपये 200 या मुद्रांक कागदावर सादर करावा लागेल, आधार कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट, अशा प्रकारची कागदपत्रे उपलब्ध असावी. अशाप्रकारे कुसुम ब च्या लाभार्थ्यांना सेल्फ सर्वे करण्याचे मेसेज आलेले असेल अशांना ऑनलाईन पद्धतीने सर्वे करावा लागणार आहे.
वन्य प्राणी यांनी केलेल्या हल्ल्यामुळे मिळणाऱ्या नुकसान भरपाईत मोठी वाढ, आता येवढे पैसे मिळणार