कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी खूप कमी दराने कांदा विकावा लागला, व याच कारणाने शेतकऱ्यांना कांदा अनुदान देण्यात यावे अशा प्रकारची मागणी वारंवार केली जात होती, तसेच याबाबत शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येईल अशा प्रकारची घोषणा करण्यात आलेली होती व त्यानुसार, 350 रुपये प्रति क्विंटल, या दराने कांदा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केले जाणार आहे.
परंतु यामध्ये काही अटी आहे व अटींमध्ये पात्र असलेले शेतकरीच अनुदानाचा लाभ घेऊ शकेल, ज्या शेतकऱ्यांनी एक फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेला असेल अशा शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी कांदा खाजगी बाजार समिती, संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती, नाफेड कडे विकल्यास त्यांना अनुदान लागू होईल.
कांदा अनुदानासाठी प्रतिक्विंटल प्रमाणे मर्यादा सुद्धा ठेवण्यात आलेली आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोनशे क्विंटल पर्यंत प्रति शेतकरी अनुदान देण्यात येईल, तसेच शासना अंतर्गत एकूण 550 कोटी रुपयांचा निधी कांदा अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे.
तसेच तुम्ही ज्या बाजार समितीमध्ये कांद्याची विक्री केलेली असेल त्या ठिकाणी अर्ज करावा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहे. अशाप्रकारे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावर 15 ऑगस्ट पर्यंत अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहे.
सर्व सामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी घसरण