राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम आहे, तसेच मागील चार ते पाच दिवसापासून अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झालेली होती, तसेच हवामान विभागांने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने वर्तवलेला आहे. तसेच राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे अनेक नद्या सुद्धा धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. त्यामुळे नागरिकांसाठी हवामानाची ही एक महत्त्वाची बातमी आहे.
राज्यातील विदर्भामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेले आहे, त्यामध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे.
या भागात रेड अलर्ट
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार चंद्रपूर तसेच गडचिरोली मध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, त्यामुळे या भागांमध्ये सतर्कतेचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे. गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क रहावे.
या भागात येल्लो व ऑरेंज अलर्ट
राज्यातील गोंदिया,भंडारा, यवतमाळ,नागपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तसेच अन्य जिल्ह्यांमध्ये दिलेल्या अंदाजानुसार येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे विदर्भामध्ये पावसाचा जोर अजूनही काही दिवस राहण्याची शक्यता वर्तवलेली आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिकांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे.
पी एम किसान योजना 14 व्या हप्त्याचे 2000 जमा झाले का? ते असे चेक करा