महाराष्ट्र राज्यामध्ये तलाठी भरतीच्या 4644 जागा, भरल्या जाणार आहे, यामध्ये व तलाठी भरतीच्या अर्ज प्रक्रियेला सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे त्यामध्ये, विद्यार्थ्यांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. तलाठी भरतीच्या अर्ज प्रक्रियेमध्ये लाखो विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे व त्यामध्ये असे लक्षात आलेले आहे की तलाठी भरती परीक्षेकरिता दहा लाख 42 हजार उमेदवार परीक्षेला पात्र ठरले आहे.
तसेच तलाठी भरती मध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण सहा विभागांचा समावेश आहे व यामधील 36 जिल्ह्यातील उमेदवारांनी नोंदणी तलाठी भरती परीक्षेमध्ये केलेली आहे. नागपूर,पुणे, नाशिक, कोकण, औरंगाबाद, अमरावती या सहा विभागांचा समावेश आहे. तसेच तलाठी भरती परीक्षेचा पेपर जिल्ह्यानुसार वेगवेगळा राहणार नाही, राज्यातील सर्व जिल्ह्यातील परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची प्रश्नपत्रिका एकच असणार आहे
तलाठी भरती परीक्षेत राज्य सरकारच्या तिजोरीत तब्बल एवढ्या कोटींची रक्कम जमा
तलाठी भरती परीक्षेमध्ये राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये 97 कोटींची रक्कम जमा झालेली आहे अशा प्रकारची माहिती सुद्धा पुढे आलेली आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्य सरकारच्या तिजोरीत रक्कम जमा झालेली आहे त्यामध्ये उमेदवारांना अर्ज भरण्याची मुदत 25 जुलै पर्यंत होती व त्या तारखेपर्यंत अनेक उमेदवारांनी तलाठी भरती परीक्षेसाठी नोंदणी केलेली आहे व भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे. तसेच तलाठी भरती परीक्षेसाठी खुल्या गटाकरिता एक हजार रुपये एवढी फी होती तर इतर गटासाठी 900 रुपये एवढी फी होती. व याच कारणाने राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात परीक्षा शुल्क द्वारा रक्कम जमा झालेली आहे.
शेतजमीन संदर्भातील फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी महसूल विभाग आणणार नवीन सॉफ्टवेअर