शेतकरी बांधवांना आता पावसाळा सुरू झालेला असून पावसाळ्यामध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, पावसाळा हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो पावसामुळे शेतकऱ्यांची शेती पीक येते परंतु अनेक वेळा काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतो अतिवृष्टी होते त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते परंतु अशा वेळेस शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप करण्यासाठी Maharain Portel वरून पावसाच्या नोंदी घेण्यात येते.
या नोंदीच्या आधारे शेतकऱ्यांची नुकसान झालेले आहे की नाही त्या भागात किती पाऊस झाला याचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांची नुकसान भरपाई वाटप होत असते. त्यामुळे आता तुमच्या भागात किती पाऊस झाला? तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये किती पावसाचे paus praman प्रमाण झाले याची माहिती आपल्याला ऑनलाइन पाहता येते.
पावसाच्या नोंदी पहा घरबसल्या ऑनलाईन:
शेतकरी बांधवांना अनेक वेळा तुम्ही टीव्ही मध्ये किंवा प्रसार माध्यमांमध्ये किंवा न्यूज पेपर मध्ये ऐकले असेल की एखाद्या भागामध्ये एवढा एवढा मिलि मीटर पाऊस झाला. किंवा एखाद्या भागामध्ये पावसाचा खंड पडला या सर्व नोंदी आता ऑनलाईन उपलब्ध झालेले आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने नवीन पोर्टल विकसित केलेल्या असून या त्यांचे नाव महा रेन पोर्टल आहे.
आपल्या भागात किती पाऊस झाला ऑनलाईन कसा पाहायचा?
आता तुम्हाला पावसाच्या नोंदी पहायच्या असेल तर खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.
1. सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये महा रेन हा शब्द टाईप करून सर्च करा.
2. आता तुमच्यासमोर महाराष्ट्र शासनाची महारेन ची अधिकृत वेबसाईट येईल ती ओपन करा.
3. वेबसाईट वर जाण्याची लिंक खाली दिलेली आहे.
4. आता या वेबसाईटवर आल्यानंतर तुमच्यासमोर विविध ऑप्शन आहे. त्यापैकी त्यानंतर करंट इयर नावाच्या पर्यावर क्लिक करा.
5. रिपोर्ट सर्कल वाईज हा पर्याय निवडा.
6. चालू महिना निवडा, आता आपला राज्य तसेच आपला विभाग आणि आपला जिल्हा निवडा.
7. तुम्ही जो जिल्हा निवडलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये असणारे सर्व सर्कल तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल आणि त्या सर्कल मध्ये झालेल्या पावसाचा संपूर्ण डेटा तुम्हाला दिसेल.
8. त्यामुळे तुम्हाला आजच्या तारखेला झालेला पाऊस या महिन्यांमध्ये टोटल झालेला पाऊस यापूर्वी झालेल्या पाऊस या सर्व नोंदी त्या ठिकाणी दिसेल.
अशाप्रकारे आता शेतकऱ्यांना घरबसल्या त्यांच्या भागामध्ये किती पाऊस झालेला आहे हे ऑनलाईन पाहता येणार आहे. ही माहिती शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना देखील नक्की शेअर करा.
पावसाच्या नोंदी घरबसल्या कशा पहायच्या या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा