रेशन कार्ड संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट प्राप्त झालेल असून रेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी अनेक कुटुंबांनी डुप्लिकेट राशन कार्ड बनवून घेतलेले आहे. रेशन कार्ड च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ सधन व्यक्ती घेत असून त्या संदर्भाची माहिती शासनाला प्राप्त झालेली असल्यामुळे आता डुप्लिकेट Ration Card रद्द करण्यात येणार आहे.
Ration Card हे एक अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज आहे. शासन रेशन कार्ड च्या माध्यमातून ते कुटुंब तसेच तो नागरिक गरीब आहे का श्रीमंत आहे, त्याचा अंदाज घेऊ शकतो. त्यामुळे रेशन कार्ड च्या माध्यमातून विविध प्रकारचे योजना त्यामध्ये प्रामुख्याने स्वस्त रेशन धान्य मोफत रेशन धान्य आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. परंतु आता राज्यात डुप्लिकेट रेशन कार्डचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले असून अशी Ration Card बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे.
राज्यात 2 लाख 32 हजार रेशन कार्ड डुप्लिकेट:
आपल्या महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस बोगस रेशन कार्ड धारकांची संख्या वाढत आहे विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी नागरिकांनी यापूर्वी एकाच कुटुंबातील विविध व्यक्तींच्या नावाने विविध प्रकारचे रेशन कार्ड बनवून घेतलेले आहे. राज्यात सध्या 2 लाख 32 हजार 766 रेशन कार्ड डुप्लिकेट आढळलेली आहे.
एवढे रेशन कार्ड होणार रद्द:
राज्यात सापडलेल्या 2 लाख 32 हजार 766 बोगस रेशन कार्ड पैकी एकूण 1 लाख 27 हजार रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. राज्यात नागपूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बोगस रेशन कार्ड आहे. राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या एक घर एक रेशनिंग कार्ड योजनेअंतर्गत एकापेक्षा जास्त रेशन कार्ड असणाऱ्या व्यक्तींची रेशन कार्ड तसेच Duplicate Ration Card रद्द होणार आहे.
स्वस्त रेशन धान्य मिळण्यासाठी नागरिकांनी बनवले डुप्लिकेट कार्ड:
राज्यात गरीब कुटुंबांना मोफत रेशन धान्य तसेच स्वस्त रेशन धान्य उपलब्ध करून दिले जाते, या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अनेक व्यक्तींनी एकापेक्षा जास्त एकाच कुटुंबात रेशन कार्ड बनवलेले आहेत त्यामुळे आता हे ration card रद्द होणार आहे. शासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या योजनेचा लाभ समाजातील गरीब व गरजू लोकांना मिळावा यासाठी राज्य शासन वेळोवेळी विविध प्रकारच्या मोहीम तसेच योजना आणत असते.