पॅनकार्ड आधार कार्डला लिंक कसे करायचे,संपूर्ण माहिती मित्रांनो पॅनकार्ड आणि आधार कार्ड हे सर्वांसाठी अत्यंत महत्वाचे दस्तऐवज आहेत.अनेक अशी सरकारी तसेच खाजगी कामे असतात ज्यामधे पॅनकार्ड व आधार कार्ड हे लागतेच.सध्या पॅन कार्ड हे सध्या अत्यंत महत्वाचे document झाले आहे.तसेच आधार कार्ड शिवाय तुम्ही कोणतेही शासकीय योजना मिळवू शकत नाही. त्यामुळे तुमचे पॅन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
पण आता केंद्रीय मोदी सरकारच्या नवीन नियमानुसार पॅनकार्डला आधार कार्ड लिंक करावे लागणार आहे व हे सर्वांसाठी त्यांनी अनिवार्य केले आहे. जर तुम्ही पॅन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक केले नाही तर तुमच्या जवळ असलेले पॅनकार्ड हे बंद पडू शकते.त्यामुळे पॅन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.आणि आजच्या या लेखामध्ये आपण पॅन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक कसे करायचे या विषयी संपूर्ण माहिती पाहत आहो.
पॅनकार्ड आधार कार्डला लिंक कसे करायचे,संपूर्ण माहिती |
भारतीय आयकर विभागाच्या मते जर तुम्ही एका पेक्षा जास्त पॅनकार्ड वापरत असाल, तर income tax च्या कायदा सेक्शन 272B अंतर्गत 10,000 रुपये दंड तुम्हाला भरावा लागू शकतो. तसेच 31 मार्च २०२१ पर्यंत कार्डधारकांनी जर पॅनकार्ड आणि आधार कार्डला लिंक नाही केलं तर पॅनकार्ड बंद पडू शकते निष्क्रिय होऊ शकते. व आणि तुम्हाला दंड ही भरावा लागू शकतो त्यामुळे आपले pan card हे adhar card सोबत लिंक असेलच पाहिजे.मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाइन घरी बसूनच तुमचे पॅन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक करू शकता.
.
पॅनकार्ड आधार कार्डला लिंक कसे करायचे, जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया:
1) पॅनकार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्यासाठी सर्वात अगोदर खाली दिलेली income tax ची website ओपन करा.
https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/LinkAadhaarHome.html?lang=eng
2) वरील वेबसाईट ओपन केल्या नंतर तुमचा पॅनकार्ड नंबर,आधार नंबर, व नाव टाकून तुम्हाला दिसत असलेला कॅप्चा कोड व्यवस्थित पणे भरा
4) त्यानंतर तुम्हाला खाली लिंक आधार हा ऑप्शन दिसेल त्या लिंक आधार‘या पर्यायावर क्लिक करा असे केल्या नंतर तुमचे आधार कार्ड व पॅनकार्ड लिंक करण्याची प्रोसेस पूर्ण होईल.
अश्या पद्धतीने तुम्ही तुमचे पॅन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक करू शकता
आधार कार्ड -पॅनकार्ड लिंक झाले किंवा नाही ते असे पहा:-
आता तुम्ही तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक झाले की नाही हे तुम्ही पाहु शकता ते असे पहा
1)तुमचे आधार कार्ड हे पॅनकार्ड सोबत लिंक झाले किंवा नाही ते पाहण्यासाठी खाली दिलेल्या income tax च्या वेबसाईट ला ओपन करा.
https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/AadhaarPreloginStatus.html
2) त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर आणि तुमचा पॅनकार्ड नंबर त्या बॉक्स मध्ये टाका.
४) त्यानंतर तुम्हाला खाली दिसत असलेल्या ‘View Link Aadhaar Status’या पर्यायावर क्लिक करा.
वरील प्रोसेस पूर्ण झाल्या नंतर आता तुमचे पॅनकार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक झाले किंवा नाही ते दिसेल.तिथे खाली आधारकार्ड लिंक झाले आहे असा मॅसेज तुम्हाला दिसेल.
मित्रांनो अशा करतो की तुम्हाला हा लेख आवडला असेल आवडल्यास नक्की शेअर करा.
हे सुध्दा वाचा:- रेशन कार्ड डाऊनलोड करा ऑनलाइन पहा संपूर्ण माहिती