Mansoon Update: शेतकरी मित्रांनो, आता पाऊस लांबला, मानसून यायला अजून पहावी लागेल वाट, एवढा पाऊस येईपर्यंत पेरणीची घाई करू नका

शेतकरी मित्रांनो सध्या हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. हवामानाचे चक्र हे बिघडलेले असून आणि उन्हाळ्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली होती. आणि आता पावसाळ्याचे दिवस आलेले असून म्हणजेच पावसाच्या तारखा जवळ आलेल्या असून मान्सून मात्र निर्माण झालेल्या खराब परिस्थितीमुळे लांबला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात पेरणी संदर्भात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहे. पेरणी करण्याचा कालावधी जवळ आलेला असून अजून महाराष्ट्रात मान्सूनची Mansoon Update एन्ट्री झालेली नाही.

 

त्यामुळे शेतकरी सध्या पेरणी संदर्भात विविध मनस्थिती असून हवामान मध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी मान्सूनची वाट पहावी तसेच योग्य प्रमाणात पाऊस होईपर्यंत पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाने केलेले आहे.

 

मान्सून का लांबला?

शेतकरी मित्रांनो अरबी समुद्रामध्ये बिपरजॉय नावाचे चक्रीवादळ निर्माण झालेली असल्यामुळे त्याचा परिणाम एकंदरीत मान्सूनच्या गतीवर झाला. आणि हवामानाची चक्र बिघडली आणि मान्सून लांबल्या गेला.

राज्याच्या काही भागात दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झालेला होता, त्यामुळे त्या भागातील शेतकरी आनंदी झाला कारण की त्यांना वाटले आता मान्सून आला आणि पेरणीचे दिवस जवळ आले. परंतु तेवढ्यातच cyclone संदर्भात माहिती पुढे आली आणि मान्सून लेट होण्याची शक्यता निर्माण झाली. जर मानसून चे आगमन झाले असते तर बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली असती.

 

 

पेरणी संदर्भात कृषी विभागाचे आवाहन:

सध्या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असून चक्रीवादळामुळे हवामानाची संपूर्ण परिस्थिती बिघडलेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये, कमी पावसावर पेरणी करू नये असे केल्यास त्याचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागू शकतो.

 

एवढा पाऊस पडल्यावरच पेरणी करा:

कृषी विभागाने केलेल्या आवाहनानुसार 80 ते 100 मिलिमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये. जमिनीमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात उष्णता साठवलेली असते त्यामुळे पेरणी करण्याकरिता वरील मिलिमीटर मध्ये जमिनीमध्ये पाऊस पडणे आवश्यक असते.

MSP 2023: ब्रेकिंग न्युज, खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ, शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आता एवढा मिळेल पिकांना शासकीय दर

एक वेळेस शेताने ओलावा धरला की आपण पेरणी केल्या नंतर त्याची उगवण क्षमता वाढते आणि चांगल्या प्रमाणात पीक उगवते. तसेच थोडाफार प्रमाणात पावसाचा खंड जरी पडला तरी पीक तग धरून राहते जेणेकरून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येत नाही.

 

Mansoon Update: नवीन संकट, येत्या 24 तासात धडकणार चक्रीवादळ! आता मान्सून 10 दिवस लांबणार, ताजा हवामान अंदाज

Leave a Comment