Atikraman Arj: आपल्या आजूबाजूच्या परिसरातील अतिक्रमण कसे काढायचे? अतिक्रमण हटवण्यासाठी हा अर्ज करा

मित्रांनो आजकाल प्रत्येक जागी प्रत्येक व्यक्तीच्या माध्यमातून थोड्याफार प्रमाणात का होईना पण अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो, किंवा अनेक जणांनी अतिक्रमण सुद्धा केलेली आहे. जर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एखाद्या व्यक्तीने अतिक्रमण केलेले असेल तर त्याचा त्रास आपल्याला सहन करावा लागतो. भविष्यामध्ये जर अतिक्रमण करणाऱ्यांची संख्या वाढत गेली तर त्या ठिकाणी आपल्याला आपले वास्तव करणे कठीण होईल. त्यामुळे कायदेशीर रित्या अतिक्रमण कसे हटवायचे त्याकरिता अर्ज कसा करायचा या Atikraman Arj संदर्भात माहिती आपण या लेखात जाणून घेऊया.

 

मित्रांनो ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग प्रत्येक ठिकाणी आपल्याला अतिक्रमण केलेले दिसते. अनेक ठिकाणी अनेक व्यक्तींनी दुसऱ्या व्यक्तीच्या जागेवर ताबा मिळवलेला असतो, ती जागा अतिक्रमित केलेली असते. Atikraman करणाऱ्या व्यक्ती सुरुवातीला शांत राहतात परंतु काही दिवसांनी कोणीच आवाज न उठवला तर ती जागा स्वतःची असल्याचे दाखवतात.

 

त्यामुळे अशा अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींना रोखण्यासाठी तसेच त्यांना आळा घालण्यासाठी आपण कायदेशीर रित्या हे अतिक्रमण हटवण्यासाठी अर्ज करू शकतो. अनेक ठिकाणी अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात वाद देखील निर्माण झालेले आहेत.

 

आपल्या शेत जमिनीवर अतिक्रमण झाले का ते असे चेक करा?

जर तुम्हाला वाटत असेल की शेजारच्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा काही हिस्सा त्याच्या ताब्यात घेऊन त्या जमिनीवर अतिक्रमण केलेले आहे. तर अशा वेळेस आपण शासकीय पद्धतीने जमिनीची मोजणी करू शकतो त्यानंतर नकाशाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या जमिनीवर शेजारच्या शेतकऱ्यांनी किती अतिक्रमण केले याची माहिती मिळेल. अशा परिस्थितीत आपण ते अतिक्रमण हटवण्यासाठी अर्ज करू शकतो.

 

Property Rights: पतीच्या संपत्तीवर पत्नीचा किती अधिकार असतो? संपत्तीत पत्नी ला अधिकार मिळतो का? कसा व केव्हा?

 

अतिक्रमण कसे हटवायचे? त्याकरिता अर्ज कसा करायचा? Atikraman Arj PDf

महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 च्या कलम 138 नुसार आपल्याला जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी कायदेशीर रित्या अर्ज करता येतो. हा अतिक्रमण हटवण्याचा अर्ज तुम्ही तहसीलदार यांच्याकडे सादर करू शकतात. अतिक्रमणासाठी तक्रार दाखल करणारा अर्जाचा नमुना आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला तो अर्ज पाहिजे असेल तर खालील लिंक करून ते तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकतात.

 

अतिक्रमण हटविण्याची अर्ज pdf

 

 

वरील अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा प्रिंट काढा आणि त्या अर्जासोबत त्या शब्दांचा कच्चा नकाशा जोडा तसेच शासकीय जमीन मोजणी केलेली असेल. तर त्याची छायांकित प्रत जोडा. तसेच सातबारा जोडा. वरील अर्ज व्यवस्थितपणे भरा कोणत्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेले आहे कोणत्या क्षेत्रावर केलेली आहे किती क्षेत्रावर केलेली आहे याची संपूर्ण माहितीच्या अर्जामध्ये व्यवस्थितपणे भरा आणि तो अर्ज तहसीलदार कार्यालयामध्ये जमा करा.

 

शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं, आता घरबसल्या करा सातबारा वर वारसाची नोंद, सातबाऱ्यावर घरातील व्यक्तीचे नाव टाका ऑनलाईन