समाज कल्याण हॉस्टेल काय आहे? अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, सोयी सुविधा कोणत्या मिळतात | How to get admission in Samaj kalyan hostel

आजच्या या लेखा मध्ये आपण समाज कल्याण हॉस्टेल काय आहे? या Samaj kalyan hostel मध्ये अर्ज कसा करायचा? कागदपत्रे कोणती कोणती लागतात? आणि कोण या समाज कल्याण हॉस्टेल मध्ये अर्ज करू शकतो त्याच प्रमाणे समाज कल्याण हॉस्टेल मध्ये विद्यार्थ्यांना कोणत्या कोणत्या सुविधा पुरविल्या जातात या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

समाज कल्याण हॉस्टेल काय आहे? अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, सोयी सुविधा कोणत्या मिळतात | How to get admission in Samaj kalyan hostel
समाज कल्याण हॉस्टेल काय आहे? अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, सोयी सुविधा कोणत्या मिळतात | How to get admission in Samaj kalyan hostel

 

 

समाज कल्याण हॉस्टेल काय आहे?

समाज कल्याण हॉस्टेल हे महाराष्ट्र शासनाच्या सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या मार्फत चालविण्यात येणारे वसतिगृह असते. हे वसतिगृह संपूर्णतः मोफत असून ज्या विद्यार्थ्यांचा या samaj kalyan hostel मध्ये नंबर लागतो, अशा विद्यार्थ्यांना सर्व गोष्टी मोफत पुरविण्यात येत असतात. हे hostel government हॉस्टेल म्हणून सुद्धा ओळखण्यात येत असते. या समाज कल्याण हॉस्टेल मध्ये गरीब व गरजू विद्यार्थ्यांना राहण्याच्या सोयी बरोबरच अनेक सुविधा जसे निर्वाह भत्ता, ड्रेस, शालेय साहित्य मोफत पुरविण्यात येत असतात. या समाज कल्याण हॉस्टेल ला दुसरे नाव हे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह(magasvargiy mulanche shaskiya vastigruh) असे सुद्धा नाव देण्यात आले आहे.

 

समाज कल्याण हॉस्टेल मध्ये अर्ज कसा करायचा?How to get admission in Samaj kalyan hostel:-

समाज कल्याण हॉस्टेल मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पैकी एका पद्धतीने असते. जर ऑनलाईन समाज कल्याण हॉस्टेल मध्ये अर्ज करता येत नसेल तर तुम्हाला संबंधित समाज कल्याण विभाग च्या वसतिगृहांत जाऊन त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह(magasvargiy mulanche shaskiya vastigruh

 

समाज कल्याण हॉस्टेल चे अर्ज ऑफलाईन आहे की ऑनलाईन हे माहीत करून घेण्यासाठी तुम्ही आपल्या महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही समाज कल्याण विभाग च्या वसतिगृहात जाऊन चौकशी करून माहित करून घेऊ शकतात. त्या नंतर अर्ज करावा. अर्ज केल्या नंतर तीन याद्या लागत असतात. या यादी मध्ये तुमचे नाव आल्यास तुम्हाला उर्वरित कागदपत्रे त्या समाज कल्याण विभाग हॉस्टेल मध्ये जमा करून त्या वसतिगृहातील गृहपाल यांना भेटून त्यांच्या सूचनेनुसार admission करावयाची असते. जर तुमचे पहिल्या यादीत नाव आले नाही तर तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीची वाट पाहावी लागते. ही यादी ऑफलाईन वसतिगृहातील सूचना फलकावर लावलेली असते. जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला वसतिगृहातील कॉल येतो.

हे नक्की वाचा:-  barti मार्फत बँक, रेल्वे, एसएससी आणि पोलिस भरती या परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण व स्कॉलरशिप 

समाज कल्याण हॉस्टेल मध्ये admission घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे( government hostel documents):-

समाज कल्याण विभाग अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या या वसतिगृहात admission घेण्यासाठी खालील कागदपत्रे तुम्हाला जमा करावी लागत असतात. Government hostel, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह(magasvargiy mulanche shaskiya vastigruh)

१)मागील वर्षाची गुणपत्रीका

२)शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र

३)जातीचे प्रमाणपत्र

४)वडिलांचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र

५)आधार कार्ड झेरॉक्स

६)बँक पासबुक झेरॉक्स

७)बोनाफाईट प्रमाणपत्र

८) राशन कार्ड झेरॉक्स

९)दारीद्र रेषेचे प्रमानपत्र झेरॉक्स(जर दारिद्य्र रेषेखालील असाल तर)

१०)अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र अनाथ असल्यास प्रमाणपत्र(अपंग व अनाथ यांसाठी राखीव जागा असतात म्हणून हे प्रमाणपत्र असेल तर जोडावे.)

११)मेडीकल प्रमानपत्र(हॉस्टेल मध्ये नंबर लागल्या नंतर जमा करावे लागते)

१२)मोबाइल नंबर (स्वत:चा)

१३)मोबाइल नंबर (पालकाचा)

१४)पासपोर्ट फोटो

१५)18 वर्ष वरील वि. लस प्रमानपत्र( सध्या कोरोणा ही महामारी असल्यामुळे लसीकरणाची प्रमाणपत्र)

 

समाज कल्याण हॉस्टेल मध्ये कोण – कोण अर्ज करू शकतो:-

जे विद्यार्थी मागासवर्गीय या category मध्ये येतात ते मुले या समाज कल्याण हॉस्टेल साठी अर्ज करू शकता. Sc, st तसेच नवबौध्द आणि इतर मागास वर्गीय विद्यार्थी(obc) तसेच अपंग आणि अनाथ या category मधील सर्व जण समाज कल्याण विभाग hostel मध्ये अर्ज करू शकतात. या मध्ये sc category मधील विद्यार्थ्यांसाठी जास्त जागा उपलब्ध असतात. अपंग आणि अनाथ साठी काही जागा या राखीव असतात.

 

 

समाज कल्याण हॉस्टेल मध्ये मिळणाऱ्या सुविधा:-

समाज कल्याण हॉस्टेल हे शासनातर्फे चालविण्यात येत असल्यामुळे या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अनेक सोयी सुविधा पुरविल्या जातात. जसे की या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थांना जर विद्यार्थी तालुका स्तरावरील हॉस्टेल मध्ये राहत असेल तर दरमहा 500 रुपये निर्वाह भत्ता हा विद्यार्थ्यांना देण्यात येतो. जर विद्यार्थी विभाग स्तरावरील हॉस्टेल मध्ये राहत असेल तर दरमहा 800 रुपये इतका निर्वाह भत्ता हा विद्यार्थ्यांना देण्यात येतो. त्याच प्रमाणे स्टेशनरी चे साहित्य खरेदी करण्यासाठी 4000 रुपये वर्षाला देण्यात येत असतात. कॉलेज किंवा शाळेत ड्रेस घेण्यासाठी ड्रेस कोड म्हणून 1500 किंवा 2000 रुपये वार्षिक देण्यात येत असतात.

 

समाज कल्याण विभाग अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थांना सकाळी नाश्ता, दूध, अंडी, फळे पुरविली जातात. तसेच या विद्यार्थ्यांना 2 वेळ पौष्टिक जेवण पुरविण्यात येत असते. आठवड्यातून दोन वेळ चिकन तसेच मटण आणि स्वीट पुरविण्यात येत असते. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थांना आंघोळी साठी गरम पाणी , वसतीगृहात अभ्यास करण्यासाठी लायब्ररी तसेच पुस्तके पुरविण्यात येत असते. तसेच खेळण्यासाठी क्रीडा साहित्य पुरविण्यात येत असते. अशा प्रकारे अनेक सोयी सुविधा विद्यार्थांना पुरविण्यात येत असते.

समाज कल्याण (शासकीय हॉस्टेल) अर्ज डाउनलोड करा 

 

हे नक्की वाचा:- विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट योजना अर्ज सुरू

अशा प्रकारे तुम्ही समाज कल्याण विभाग च्या शासकीय वसतिगृहात अर्ज करू शकतात. आणि तुमचे शिक्षण घेऊ शकतात. हा लेख तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. काही अडचण असेल कमेंट करा.

5 thoughts on “समाज कल्याण हॉस्टेल काय आहे? अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, सोयी सुविधा कोणत्या मिळतात | How to get admission in Samaj kalyan hostel”

Leave a Comment