Income Tax Rule Cash: घरात किती कॅश ठेवता येते? घरात कॅश ठेवण्या संदर्भातील नवीन नियम जाणून घ्या, नाहीतर पुढे..

आपल्या देशात आयकर विभाग आहे जे आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवून असते, त्यामुळे आयकर विभागाचे नियमानुसार आर्थिक व्यवहारांच्या काही बाबींवर निर्बंध तसेच मर्यादा असतात त्यामुळे आयकर विभागाशी संदर्भातील नियम आपल्याला माहीत असायला पाहिजे. सर्व व्यक्तींना पडणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे घरामध्ये आपण किती कॅश ठेवू शकतो? घरामध्ये कॅश ठेवण्यावर काही मर्यादा आहेत का? या Income Tax Rule for Cash संदर्भात विस्तृत माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

 

आपल्या देशात आजकाल मोठ्या प्रमाणात ऑनलाईन व्यवहाराचे प्रमाण वाढलेले असून देशात कोरोनाची साथ आल्यानंतर प्रत्येक जण ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करत आहे. त्याचबरोबर देशातील शासनाने ऑनलाईन व्यवहाराला दिलेली चालला तसेच नागरिकांना केलेले आवाहन हे सुद्धा यामागील एक महत्त्वाचे कारण आहे. घरबसल्या आता आपल्याला काही सेकंदात लाखो रुपयांची देवाण-घेवाण करता येत आहे. परंतु अजूनही बरेच जण ऑनलाईन कडे वळलेले नसून ते बँकेत पैसे न ठेवता घरातच ठेवतात त्यामुळे त्या संदर्भातील नियम आपण जाणून घेऊ या.

 

ऑनलाइन व्यवहार सुलभ तसेच सोयीस्कर असून सुद्धा अजूनही बरेच जण रोख व्यवहारास प्राधान्य देतात. त्यामुळे अशा व्यक्तींना त्यांच्या घरामध्ये किती रोकड ठेवता येईल या संदर्भात माहिती खाली दिलेली आहे.

 

आपल्याला घरात किती रोकड ठेवता येते?

घरात किती रोकड असावी या संदर्भात इन्कम टॅक्स विभागाच्या कोणत्याही नियमात कोणतेही मर्यादा नाही. म्हणजेच आपण आपल्याला हवी तेवढी Cash आपल्या घरात ठेवू शकतो परंतु जर तुमच्या घरात असलेली रोकड तपास यंत्रणेच्या हाती लागली म्हणजेच ती पकडला गेली तर तुम्हाला त्या रोख रकमेचा स्त्रोत सांगावा लागेल म्हणजेच तुमच्या घरात असलेले ते पैसे कोणत्या मार्गाने आलेले आहे याची माहिती Income Tax विभागाला द्यावी लागेल. जर तुम्ही हे पैसे योग्य पद्धतीने कमवले असेल चुकीच्या पद्धतीने कमावलेली नसेल तर तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नसून त्या संदर्भातील तुमच्याकडे संपूर्ण कागदपत्रे असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही.

 

बँकेतून एका वर्षाला किती रोकड काढता येते?

भारतातील सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या म्हणण्यानुसार जर एखाद्या व्यक्तीला एका वेळेस 50000 पेक्षा जास्त रोख काढायचे असेल तर त्याला पॅन क्रमांक द्यावा लागतो. तसेच एका वर्षात वीस लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा किंवा काढता येऊ शकते.

 

Ration Card: महत्वाची बातमी, आता फक्त याच रेशन कार्ड धारकांना मिळणार ‘फ्री’ रेशन धान्य, तुम्हाला मिळणार का?

 

अथवा दंड होऊ शकतो

जर तुम्ही तुमच्या घरात असलेल्या रोख रकमेचा स्त्रोत सांगू शकला नाही तर तुम्ही अडचणीत येऊ शकतात आणि जर ही रोकडा घोषित निघाली तर तुमच्याकडून खूप मोठ्या प्रमाणात कर लावून वसूल केल्या जाऊ शकतो. अघोषित रोकड वर 137% पर्यंत देखील कर लावण्यात येतो. त्यामुळे तुमच्या घरात किती रोकड असावी यावर निर्बंध तसेच मर्यादा नसून तुम्हाला त्या रोकडचा स्त्रोत सांगावा लागेल. जर तुम्ही असे करू शकले नाही तर तुम्हाला दंड देखील होऊ शकतो.

CM Kisan Yojana: खुशखबर; शेतकऱ्यांना पुढच्या महिन्यात राज्य सरकार देणार 2 हजार रुपये, 2000 पाहिजे तर ‘हे’ काम लगेच करा 

Leave a Comment