100 रुपयात जमीन नावावर कशी करायची? कुटुंबाच्या सहमतीने जमीन नावावर करण्याची खात्रीशीर पद्धत | Land Registration 100 Rs

कुटुंबातील जमिनीचे वाटप करत असताना आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. जर जमीन वडिलोपार्जित असेल तर त्या जमिनीवर ज्या सदस्यांचा हक्क असतो ते सदस्य लवकरात लवकर ती जमीन आपल्या नावावर करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. जर कुटुंबाची जमीन तुम्हाला नावावर करायची असेल आणि सर्वांची सहमती असेल तर त्याकरिता तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणात उठाठेव करण्याची आवश्यकता नसून केवळ एक अर्ज आणि त्याचबरोबर जमिनीचा कच्चा नकाशा दिल्यास हिष्याचे वाटप करता येते. त्यामुळे या लेखात आपण Land Registration in 100 Rs बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

 

जर कुटुंबातील वडिलोपार्जित जमीन तुम्हाला तुमच्या सदस्यांची नावे करायचे असेल तर त्याकरिता जास्त खर्च सुद्धा येत नाही. कुटुंबातील सर्व सदस्यांची सहमती असेल तर एक अर्ज करून तुम्ही जमीन नावावर करू शकतात. त्याकरिता अर्जावर कुटुंबातील सर्व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असायला पाहिजे. त्याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 85 मध्ये तरतूद आहे.

 

खालील तीन पद्धतीने तुम्ही जमीन नावावर करू शकतात:

जमिनीचे वाटप करण्यासाठी म्हणजे जमिनीचे क्षेत्र विभागून देण्यासाठी खालील तीन पद्धतीचा अवलंब करता येतो.

1. महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 कलम 85 नुसार

2. दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करून

3. दुय्यम निबंधकासमोर नोंदणीकृत वाटप करता येते

 

जमीन नावावर करण्यासाठी लागणारे शुल्क?

महाराष्ट्र अधिनियम मध्ये केलेल्या सुधारणा नुसार शेत जमिनीची वाटणी करण्यासाठी 100 रुपये केवळ मुद्रांक शुल्क विहित करण्यात आलेले आहे. शासनाने जाहीर केलेल्या दि. १५.५.१९९७ च्या परिपत्रकान्वये सुधारणांची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्याची निर्देश देण्यात आलेले होते परंतु अजून पर्यंत सर्व सामान्य जनतेला ही माहिती मिळालेली नाही किंबहुना याबाबत जनतेला माहिती नाही.

 

शंभर रुपयात जमीन केवळ वडिलोपार्जित किंवा वारसाच्या नावाने होणारी जमीन होत असून इतर जमिनी नावावर करण्यासाठी तुम्हाला जास्त मुद्रांक शुल्क द्यावे लागेल. महाराष्ट्र शासनाने शेत जमिनीच्या वाटणी पत्रावरील मुद्रांक शुल्काबाबत परिपत्रक जाहीर केलेल्या असून त्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली दिलेली आहे.

 

Varas Nondani: वारस नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कशी करायची? आता वारसाची नोंद होणार तलाठी कार्यालयामध्ये न जाता

 

शेत जमीन वाटणी बाबत अर्ज

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 85 नुसार करावयाच्या शेत जमिनीच्या वाटणी पत्र बाबत अर्जाचा नमुना आम्ही तुम्हाला खाली दिलेला आहे. जर तुम्हाला तो अर्जाचा नमुना पाहायचा असेल तर तुम्ही ते डाऊनलोड करून घ्या. त्यामध्ये शंभर रुपयाच्या मुद्रांक शुल्काबाबत माहिती तसेच जमिनीची वाटणी करावयाचा अर्ज दिलेला आहे. Land Registration 100 Rs pdf खाली दिलेला आहे.

 

100 रुपयात जमीन नावावर करण्यासंदर्भातील अर्ज पीडीएफ येथे पहा

 

वरील लिंक वरून तुम्ही संपूर्ण अर्ज पीडीएफ पाहू शकतात. ही माहिती तुमच्या इतर मित्रांना देखील नक्की शेअर करा, अशाच माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Varas Nondani: वारस नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कशी करायची? आता वारसाची नोंद होणार तलाठी कार्यालयामध्ये न जाता