MahaDbt Scholarship 2021-22 अर्ज सुरू | शिष्यवृत्ती अर्ज सुरू

मित्रांनो maha dbt scholarship अंतर्गत शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनातर्फे स्कॉलरशिप ही देण्यात येत असते. या महा डीबीटी स्कॉलरशिप पोर्टल वर अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती साठी अर्ज हे स्विकारण्यात येत असतात. विविध अभ्यास क्रमामध्ये शिक्षण घेत असलेल्या तसेच विविध category मध्ये मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना या महा डी बी टी स्कॉलरशिप पोर्टल च्या अंतर्गत एकाच ठिकाणी अर्ज हा करावयाचा असतो.

MahaDbt Scholarship 2021-22 अर्ज सुरू | शिष्यवृत्ती अर्ज सुरू

 

या चालू वर्षाचे सण २०२१-२०२२ चे स्कॉलरशिप योजने चे अर्ज हे सुरू झालेले आहेत. संबंधित सर्व विद्यार्थ्याना scholarship चे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने maha dbt scholarship portal वर करावयाचे आहेत. या संबंधीची म्हणजेच स्कॉलरशिप चे अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ३० जानेवारी ही आहे. या अंतिम तारखे पर्यंत सर्व पात्र विद्यार्थ्यांनी maha dbt scholarship portal वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे करावयाचे आहेत.
महा डी बी टी स्कॉलरशिप पोर्टल वर अर्ज करत असताना तुम्ही ज्या योजना साठी पात्र आहात त्या सर्व स्कॉलरशिप साठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. Maha dbt scholarship portal वर अर्ज ऑनलाईन केल्या नंतर तो अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून तुमच्या महाविद्यालयात नेऊन जमा करावा लागतो.
स्कॉलरशिप अर्ज महाविद्यालयात आवश्यक ती कागदपत्रे जोडून जमा केल्या नंतर. तुमचा अर्ज verify केल्या जातो. अर्ज व्यवस्थित असल्यास त्या अर्जामध्ये काही त्रुटी नसल्यास तुमचा अर्ज पुढे मंजुरी साठी पाठविण्यात येत असतो. त्या नंतर सर्व बाबी पूर्ण झाल्या नंतर तुम्हाला redeem करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमची स्कॉलरशिप ही तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात थेट ट्रान्स्फर करण्यात येत असते.