राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी, राज्यामध्ये 21 दिवसापेक्षा जास्त काळ पावसाचा खंड पडलेला होता अशा परिस्थितीमध्ये शेती पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन अक्षरशः शेती पिके करपून गेलेली होती, व याच कारणाने राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात जवळपास 50 टक्के पेक्षा जास्त घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिवाळीपूर्वी अग्रीम पीक विम्याची रक्कम मिळावी याकरिता प्रयत्न चालू होते, व याच प्रयत्नांना आता यश आलेले आहे, पिक विमा कंपन्या अंतर्गत शेतकऱ्यांना अग्रीम पीक विम्याची रक्कम देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे, त्यानुसार राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये 1352 कोटी रुपये जवळपास 25 लाख शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल.
विमा कंपन्यांचे आक्षेप नसलेल्या जिल्ह्यांमध्ये परभणी, बुलढाणा, जालना, सांगली व कोल्हापूर यांचा समावेश आहे, पुढील जिल्ह्यांना अग्रीम पीक विम्याची रक्कम वाटप करण्यास पिक विमा कंपन्यांनी मान्यता दिलेली आहे त्यामुळे आता नंदुरबार, बुलढाणा, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, सांगली, धाराशिव, पुणे, नाशिक, नगर, जळगाव,सातारा, नागपूर, नगर, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांना अग्रीम पीक विमा देण्यात येईल.
राज्यातील आतापर्यंत नांदेड, चंद्रपूर, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांबाबत आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही तसेच वाशिम जिल्ह्यांबाबत संभ्रमच निर्माण होऊन आहे. त्यामुळे वरील दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना लवकरच अग्रीम पीक विम्याची रक्कम वितरित करण्यात येईल.
कांद्याच्या दराने गाठली उच्चांक पातळी, बघा काय आहे कांद्याचे दर