पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर, पंधराव्यां हप्त्यापासून हे शेतकरी वंचित राहणार | PM Kisan Yojana

केंद्र सरकार अंतर्गत शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजना राबविण्यात येते, तसेच आतापर्यंत देशातील अनेक शेतकरी पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र ठरलेले असून शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत चौदा हप्त्यांचे वितरण करण्यात आलेले आहे, पी एम किसान योजनेअंतर्गत मिळणारा प्रत्येक हप्ता दोन हजार रुपयांचा असतो तसेच वार्षिक सहा हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात येत असते.

शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता कधी वितरित केला जाणार याची प्रतीक्षा आहे परंतु शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे, पी एम किसान योजनेअंतर्गत अनेक शेतकरी अपात्र ठरू शकतात, त्याचे कारण म्हणजेच अनेक शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत असलेल्या अटी पूर्ण केलेल्या नाही, त्यामुळे पीएम किसान योजनेच्या पात्र शेतकऱ्यांची यादी बनवताना शेतकऱ्यांनी जर अटी पूर्ण केलेल्या नसतील तर त्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या यादीतून काढून टाकण्यात येईल.

पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पात्र ठरण्यासाठी केवायसी करणे बंधनकारक आहे तसेच जमीन नोंदणी करणे यासंदर्भातील शेतकऱ्यांनी पूर्ण केलेली असावी, शेतकऱ्यांनी बँक खात्याशी आपले आधार कार्ड लिंक केलेले असणे अत्यंत गरजेचे आहे, त्या अटी जर शेतकऱ्यांनी पूर्ण केलेल्या नसतील तर त्या शेतकऱ्यांची नावे पी एम किसान योजनेच्या यादी मधून काढून टाकण्यात येईल.

ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत असलेल्या अटी पूर्ण केलेल्या नसतील त्यांनी जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन संपूर्ण अटी पूर्ण कराव्यात त्याशिवाय शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही, याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना पंधराव्या हफ्त्यापासून मुकावे लागू शकते, पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा करण्यात येईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अटी पूर्ण कराव्या.

पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर, पंधराव्यां हप्त्यापासून हे शेतकरी वंचित राहणार | PM Kisan Yojana

अरे बापरे! ऑक्टोंबर महिन्यात बँकांना तब्बल एवढ्या दिवस सुट्ट्या राहणार, सुट्ट्यांचे नेमके कारण आहे तरी काय?