शेतकऱ्यांना कमी दरामध्ये खतांची उपलब्धता व्हावी या अनुषंगाने केंद्र शासनाने अंतर्गत 2010 पासून, खताकरिता पोषण आधारित सबसिडी देण्यात येते, शेतीसाठी 2023-24 या वर्षासाठी देण्याकरिता केंद्र शासना अंतर्गत मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळे अर्थातच शेतकऱ्यांना खतावर सबसिडी मिळेल.
खरीप हंगाम 2023 मध्ये सबसिडी देण्यास मंजुरी देण्यात आलेली होती परंतु याची मुदत 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची होती. त्यामुळे या तारखेनंतर खताच्या किमती वाढतील का अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित झालेला होता परंतु शेतकऱ्यांना खताची किंमत परवाडणार नसेल, या अनुषंगाने रब्बी हंगाम 2023-2024 करता सबसिडी देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.
रब्बी हंगाम 2023-24 या वर्षाकरिता 22,303 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तसेच ही सबसिडी एक ऑक्टोंबर 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत खतासाठी ची सबसिडी ही यामध्ये नत्र प्रकारच्या खतांसाठी47.02 पर किलोग्रॅम खतावर असणार आहे, कॉस्मेटिक खतांसाठी 20 रुपये 82 पैसे, पोटॅशियम खतासाठी प्रति किलो 2 रुपये 38 पैसे, सल्फर साठी प्रति किलो 1 रुपया 38 पैसे असणार आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे अर्थातच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे कारण संपूर्ण किमतीमध्ये खत विकत घेने शेतकऱ्यांना परवडणार नसते त्यामुळे या सबसिडीमुळे अर्थातच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
सोयाबीनच्या बाजारभावात झाली इतकी वाढ! या बाजार समितीत मिळाला सर्वोच्च दर, पहा सध्याचे दर