Ujjwala Yojana 2.0 : देशामध्ये उज्वला योजना 2.0 स्कीम, महिलांना तब्बल 75 लाख मोफत एलपीजी सिलेंडर,योजनेसाठी तब्बल 1650 करोडचा फंड

शासनांतर्गत देशातील नागरिकांसाठी तसेच महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात, राबविण्यात येणाऱ्या योजनांचा मुख्य उद्देश नागरिकांचे हित साधले जावे हाच असतो, व महिलांसाठी राबविण्यात येणारी एक उत्तम योजना म्हणजेच प्रधानमंत्री उज्वला योजना, या योजने अंतर्गत आतापर्यंत देशातील अनेक महिलांना गॅस कनेक्शन देण्यात आलेले आहे, व या योजनेत एक प्रकारची भर पडावी या उद्देशाने, केंद्र शासना अंतर्गत उज्वला योजना 2.0 स्कीम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे.

देशामध्ये उज्वला योजना 2.0 राबवण्यासाठी 1650 करोड रुपयांचा फंड जमा करण्यात आलेला असून त्या अंतर्गत राज्यातील बीपीएल अर्थातच दारिद्र्य रेषेखालील असलेल्या महिलांना योजनेचा लाभ घेता येणार आहे, तसेच देशांमध्ये 2016 पासून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सुरुवात करण्यात आलेली होती व योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील अनेक महिलांनी लाभ घेतलेला आहे.

उज्वला योजनेअंतर्गत देशातील महिलांना एलपीजी कनेक्शन उपलब्ध करून देण्यात येते त्यामुळे महिलांचा होणारा त्रास वाचतो, तसेच कोरोना काळामध्ये सुद्धा शासना अंतर्गत एलपीजी धारक महिलांना गॅस सिलेंडर भरण्यासाठी खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले होते तसेच मागील काही दिवसांत एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आलेली होती. त्यामुळे देशातील महिलांना यामुळे दिलासा मिळालेला होता.

उज्वला योजना 2.0 अंतर्गत देशातील अनेक महिलांना लाभ देण्यात येईल तसेच योजनेचा लाभ घेण्याकरिता कौटुंबिक मिळकत ही सत्तावीस हजारापेक्षा कमी असायला हवी, तसेच तब्बल 75 लाख मोफत एलपीजी कनेक्शन महिलांना देण्यात येईल. अशा प्रकारची उज्वला योजना 2.0 देशात राबविण्यात येईल, योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना अधिकृत संकेतस्थळावर फार्म भरावा लागेल फॉर्म भरून झाल्यानंतर जवळच्या गॅस एजन्सी मध्ये तो फॉर्म जमा करावा लागेल, त्यानंतर पात्र महिलांना गॅस कनेक्शन देण्यात येईल.

अजित पवार यांची घोषणा, राज्यामध्ये लवकरच तब्बल दीड लाख पदांची भरती केली जाणार