Pm Vishwakarma Scheme: या योजने अंतर्गत या नागरिकांना शासन देणार प्रतिदिन 500 रुपये, जाणून घ्या योजने बद्दल माहिती

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी घोषणा केलेली होती,त्यानुसार 17 सप्टेंबर पासून विश्वकर्मा योजना राबवण्यात येणार आहे, अशा प्रकारची घोषणा केलेली होती, तसेच या योजनेनुसार 17 सप्टेंबरला विश्वकर्मा जयंती असल्यामुळे त्या दिवस पासून देशात विश्वकर्मा योजना चालू करण्यात येईल. देशामध्ये विविध प्रकारच्या योजना नागरिकांच्या हितासाठी राबविण्यात येत असतात, अशाच प्रकारचे ही विश्वकर्मा योजना सुद्धा देशातील नागरिकांचे हित साधनारी आहे.

देशामध्ये विश्वकर्मा योजनेअंतर्गत देशातील शिल्पकार, कारागीर, छोटी मोठे व्यावसायिक यांना कर्ज उपलब्ध होणार आहे,देशामध्ये अनेक तरुण बेरोजगार आहेत, अशांना आपला स्वतःचा व्यवसाय चालू करता यावा, यासाठी फक्त पाच टक्के व्याजदराने तीन लाख रुपये पर्यंतचे कर्ज देण्यात येईल. त्याबरोबरच पंधरा हजारच रूपे कार्ड, तसेच प्रतिदिन पाचशे रुपये व मूलभूत कौशल्य प्रशिक्षण सुद्धा योजनेअंतर्गत दिले जाईल.

देशामध्ये विश्वकर्मा योजनेअंतर्गत, मिळणारे कर्ज हे विना तारण असणार आहेत, इतर ठिकाण कर्ज घ्यायचे झाल्यास कोणत्या ना कोणत्या वस्तूला तारण ठेवावे लागते त्यामुळे अनेकांना कर्ज मिळू शकत नाही परंतु देशांमध्ये राबविण्यात येणार असलेल्या विश्वकर्मा योजनेअंतर्गत विना तारण पाच टक्के दराने कर्ज देण्यात येईल. तसेच त्यामध्ये चांभार, कुंभार,लोहार, मूर्तिकार, खेळणी बनवणारे, छोटे मोठे व्यवसायिक, धोबी, मच्छीमार अशाप्रकारे अनेक नागरिकांना योजनेअंतर्गत लाभ घेता येईल.

देशामध्ये विश्वकर्माचा योजना चालू करण्यात यावी या उद्देशाने योजनेसाठी तब्बल 13000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे त्यामुळे 17 सप्टेंबर रोजी विश्वकर्मा चालू करण्यात येईल, योजनेअंतर्गत लागणारी आवश्यक कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल क्रमांक तसेच पत्त्याचा पुरावा अशा प्रकारची कागदपत्रे लागणार आहे, त्यामुळे देशामध्ये राबविण्यात येणार असलेली विश्वकर्मा योजना देशातील अनेक नागरिकांना फायदेशीर ठरेल.

 शेतकऱ्यांना चिंता देणारी बातमी, या कारणाने खतांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता