Talathi Bharti: तलाठी भरतीच्या परीक्षा या तारखे दरम्यान होणार, परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, गैर प्रकरण घडू नये म्हणून संपूर्ण दक्षता

तलाठी भरती चे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे, वेळापत्रकानुसार संबंधित तारखेच्या दरम्यान परीक्षा पूर्ण केल्या जाणार आहे. तसेच उमेदवारांना ज्या केंद्रावर परीक्षा द्यायची आहे, त्या केंद्राची नावे उमेदवारांना परीक्षेच्या दहा दिवस आधी कळविण्यात येईल, उमेदवारांना ज्या केंद्रावर परीक्षा द्यायची असेल त्या उमेदवारांनी संबंधित वेळेच्या आधी केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे.

परीक्षेचे वेळापत्रक भूमि अभिलेख विभागाच्या अंतर्गत जाहीर करण्यात आलेले आहे, तलाठी गट क या पदासाठी परीक्षा घेतल्या जाणार आहे. एकूण भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या 4466 एवढी आहे, तसेच या पदांकरिता एकूण 11 लाख 10 हजार 53 उमेदवारांनी अर्ज केलेला आहे. म्हणजेच 4466 पदासाठी 11 लाख 10 हजार 53 उमेदवार बसलेले आहे.

या तारखे दरम्यान परीक्षा

जाहीर करण्यात आलेल्या संबंधित वेळापत्रकामध्ये तलाठी गट क या पदाच्या परीक्षा 17 ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीमध्ये पार पडणार आहे. परंतु उमेदवारांना परीक्षेचे गाव जरी अगोदर समजलेले असले, तरीसुद्धा परीक्षा केंद्र तीन दिवस आधी कळविण्यात येणार आहे.

तलाठी भरतीच्या परीक्षेसाठीची संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे तसेच गैर प्रकरण घडू नये याकरिता सुद्धा दक्षता राखण्यात येत आहे, एकूण तीन टप्प्यांमध्ये परीक्षा पार पडणार आहे, सकाळी 9 ते 11, दुपारी 12:30 ते 2:30, आणि सायंकाळी 4: 30 ते 6: 30 या कालावधीत परीक्षा होणार आहे.

परीक्षेचा पहिला टप्पा 17, 18, 19, 20, 21, ऑगस्ट या तारखेला होणार आहे, तसेच परीक्षेचा दुसरा टप्पा, 26 ऑगस्ट ते एक सप्टेंबर या तारखेला होणार आहे,तिसरा टप्पा,4 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या तारखांना होणार आहे.

Talathi Bharti: तलाठी भरतीच्या परीक्षा या तारखे दरम्यान होणार, परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, गैर प्रकरण घडू नये म्हणून संपूर्ण दक्षता

मध केंद्र चालू करायचे आहे?मध केंद्र योजना, अर्ज सुरू