विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी,ECS शिष्यवृत्ती 1 ते पदव्युत्तर स्तरावर जे विद्यार्थी शिकतात अशा विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप साधारण 75000 रुपयापर्यंत ची दिली जाणार आहे. समाजातील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने तसेच जे विद्यार्थी गुणवंत असून सुद्धा त्यांचे कुटुंब त्यांचा आर्थिक भार सांभाळू शकत नाही अशा विद्यार्थ्यांना HDFC Bank Parivartan ECS Scholarship अंतर्गत आर्थिक मदत दिली जाते.
शिष्यवृत्ती अंतर्गत शैक्षणिक पात्रते नुसार शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागतो व अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2023 आहे, जर विद्यार्थी देण्यात आलेल्या काही अटींमध्ये पात्र ठरत असेल तर विद्यार्थ्याने 31 ऑगस्ट पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची संपूर्ण माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे.
इयत्ता पहिली ते सहावी साठी INR 15,000 रू,तसेच सातवी ते बारावी साठी, INR 18,000 रू, सामान्य डिप्लोमा कोर्स करिता INR 20,000 रू, व्यावसायिक UG अभ्यास क्रमासाठी INR 30,000,अभ्यासक्रमासाठी INR 50,000, PG सामान्य अभ्यासक्रमासाठी INR 35,000,PG अभ्यासक्रमांसाठी INR 75,000 अशाप्रकारे असणार आहे.
अर्ज करणाऱ्या विद्यार्थी सरकारी किंवा सरकारी अनुदानित शाळेमध्ये पहिली पासून ते पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत शिकत असलेला हवा. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखा पेक्षा कमी असायला हवी. भारतातील रहिवासी, वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटांचा सामना करावा लागत असल्यास व यामुळे शैक्षणिक खर्च भागवता येत नाही अशांना प्राधान्य देण्यात येणार आहे. विद्यार्थी 55% गुणासह उत्तीर्ण असायला हवा.
वरील scholarship अंतर्गत अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया बघण्यासाठी इथे क्लिक करा