Cotton market price: कापसाच्या वायदे बाजारात चांगली वाढ, मार्केटमध्ये दर काय? कापूस लागवड ची स्थिती काय?

मागील काही दिवसांमध्ये कापसाच्या दरामध्ये नीचांक पातळी बघायला मिळालेली होती, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केलेली होती अशे शेतकरी मात्र चिंतेत झालेले होते, व अनेक दिवसांपासून कापसाचा दरामध्ये सुधारणा होत नसल्याने कापसाच्या भावात सुधारणा होणार नाही या संभावनेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस विकलेला होता व त्यामुळे बाजारातील आवक वाढली व कापसाच्या दरामध्ये आणखी घसरण झाली, परंतु अनेक दिवसांनी आता पावसाच्या दरांमध्ये देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये कापसाच्या वायद्यांमध्ये सुधारणा दिसलेली आहे.

 

कापसाने आंतरराष्ट्रीय बाजारात वायद्यांमध्ये 84 सेंटरचा टप्पा पार केलेला होता तसेच देशातील बाजारामध्ये वायदे 58 हजारावर पोहोचले, कापसाच्या दरामध्ये सुधारणा झालेली आहे तसेच कापसाच्या दरात चढ-उतार होतच आहे परंतु कापूस दरात ही एक उच्चांक पातळी खूप दिवसानंतर बघायला मिळाली 84 सेंटरचा टप्पा पार केलेला आहे,

 

कापसाला सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे पन्नास रुपयांचा भाव मिळालेला आहे तसेच सात हजार ते सात हजार चारशे रुपये पर्यंत कापसाचे दर आहे परंतु हे दर कायम टिकून राहत नाही असे बघायला मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हवी अशी अपेक्षित कापसाच्या दरामध्ये मोठी वाढ होत नाही पुढील काळामध्ये कापसाच्या आवके मध्ये घट झाली तर कापसाच्या दरात सुधारणा होऊ शकतात,कापूस अभ्यासकांनी सांगितलेले आहे, त्यामुळे आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरामध्ये साठवून ठेवलेला आहे. इथून पुढे कापसाच्या दराची स्थिती काय असेल याच्याकडे सर्वांचे लक्ष आहे.

खाजगी जमीन संपादित करण्यासंदर्भातील भूसंपादन कायदा काय आहे? सरकार याच कायद्याद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेते | Land Acquisition Act

तसेच कापसाच्या दरावर अनेक कारणे अवलंबून असतात त्यामध्ये कापसाची लागवड तसेच पिकांची स्थिती बाजारात होणारी कापसाची आवक इत्यादी गोष्टींवर कापसाचे भाव अवलंबून असतात, त्यामुळे या सर्व गोष्टींवर कापसाचे भाव अवलंबून असल्यामुळे कापसाच्या दरांमध्ये चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

Pm Kisan 14th Installment: पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर, या तारखेला 11 वाजता जमा होणार, तारीख फिक्स