Garpit Nuksan Maharashtra: गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; 177 कोटी मंजूर, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळाला

राज्यामध्ये मार्च महिन्याच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात गारपीट व अवकाळी पाऊस झाला होता. त्या अनुषंगाने राज्यातील रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते, अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 177 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मे महिन्यात झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असून प्रत्येक जिल्ह्याकरिता वेगवेगळ्या निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण आजच्या या पोस्टमध्ये 177 कोटी पैकी कोणत्या जिल्ह्याला किती कोटी रुपये Garpit Nuksan मिळणार याची माहिती जाणून घेणार आहोत.

 

राज्यात मार्च महिन्यामध्ये दोन टप्प्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट व अवकाळी पाऊस झाला होता. याचा फटका प्रामुख्याने हरभरा व गहू तसेच फळबाग पिके यांना मोठ्या प्रमाणात बसला होता. त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने संबंधित यंत्रणेला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पंचनामाच्या आधारे Maharashtra Garpit Nuksan Bharpai वितरित करण्यासाठी 177 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे.

 

हे 177 कोटी रुपये 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार असून रब्बी हंगामामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत. कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती कोटी रुपये Garpit Nuksan Bharpai मंजूर झाली आहे त्याची माहिती खाली दिलेली आहे.

 

जिल्हा निहाय मंजूर झालेला निधी:

खाली जिल्ह्याचे नाव दिलेले असून कोणत्या जिल्ह्याला किती कोटी रुपये मिळणार याचा तपशील खालील प्रमाणे आहे.

1. अमरावती- 2 कोटी 38 लाख 54 हजार रुपये

2. अकोला – 4 कोटी 49 लाख रुपये

3. यवतमाळ- 6 कोटी 91 लाख

4. बुलढाणा- 7 कोटी 92 लाख

5. वाशिम- 2 कोटी 85 लाख

6. नाशिक- 17 कोटी 36 लाख

7. धुळे- 6 कोटी 75 लाख

8. जळगाव- 20 कोटी 42 लाख रुपये

9. नंदुरबार- 8 कोटी 13 लाख

10. अहमदनगर – 10 कोटी 41 लाख रुपये

11. पुणे- 70 लाख रुपये

12. सातारा- 70 लाख रुपये

13. सांगली- 3 लाख रुपये

14. कोल्हापूर- 1 लाख 14 हजार रुपये

15. सोलापूर- 3 कोटी 92 लाख

16. छत्रपती संभाजीनगर- 22 कोटी 17 लाख

17. जालना- 3 लाख 67 हजार रुपये

18. परभणी- 4 कोटी 37 लाख रुपये

19. हिंगोली- 6 कोटी 4 लाख रुपये

20. नांदेड- 30 कोटी 52 लाख रुपये

21. बीड- 5 कोटी 99 लाख रुपये

22. लातूर- 10 कोटी 56 लाख रुपये

23. धाराशिव- 1 कोटी 39 लाख रुपये

 

177 कोटी निधी वितरणाचा शासन निर्णय येथे पहा 

 

Crop Loan: शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणे सुरू; या जिल्ह्यात पीक कर्ज वाटप सुरुवात, तुम्हाला कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती 

 

अशाप्रकारे वरील 23 जिल्ह्यांकरिता मार्च महिन्यात झालेल्या मोठ्या प्रमाणातील गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्यांना 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपये वितरित करण्यात येत आहे.

 

अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, इतक्या कोटी रुपयांची नुकसान भरपाई या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात