GDP काय आहे, GDP कसा मोजतात, GDP अर्थ मराठी | GDP Information In Marathi

 

मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये आपण एका महत्त्वपूर्ण विषयावर माहिती पाहणार आहोत. तो विषय म्हणजे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण असणारा GDP होय.

 

कोणत्याही देशाची आर्थिक परिस्थिती आपल्याला GDP नुसार कळते. आपण बरेच वेळा ऐकले असेल की देशाचा GDP कमी झाला, देशाचा जीडीपी वाढला. जीडीपी दर एवढा राहिला तेव्हडा राहील जीडीपी दर स्थिर रहाला. हे तुम्ही एकत असाल परंतु तुम्हाला GDP म्हणजे काय आहे? हे माहीत नसेल तर ते समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण आजच्या या पोस्ट मध्ये GDP विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

 

GDP काय आहे, GDP कसा मोजतात, GDP अर्थ मराठी | GDP Information In Marathi
GDP काय आहे, GDP कसा मोजतात, GDP अर्थ मराठी | GDP Information In Marathi

 

 

GDP चा फुल फॉर्म  | GDP Full Form In Marathi :-

 

GDP चे पूर्ण नाव हे Gross Domestic Product असे आहे. हे जी डी पी चे इंग्लिश मधील पूर्ण नाव झाले. आपल्या मराठी भाषेत आपण GDP ला सकल देशांतर्गत उत्पादन असे म्हणतो.

 

जीडीपी हा शब्द उच्चार अमेरिकन शास्त्रज्ञ सायमन यांनी यु एस काँग्रेसमध्ये सुरुवातीला केला होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय  संस्था IMF ने GDP हा शब्द वापरला तेव्हापासून संपूर्ण जगात GDP शब्द वापरला जातो. कोणत्याही देशाची आर्थिक परिस्थिती समजून घेण्यासाठी GDP हे महत्त्वपूर्ण ठरत आहे.

 

हे सुद्धा वाचा:- पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती

 

GDP म्हणजे काय आहे? | What is GDP in Marathi:-

GDP ला मराठी भाषेत सकल देशांतर्गत उत्पादन असे म्हणतात. देशातील अर्थव्यवस्थेचा एकंदरीत आढावा घेण्यासाठी GDP हे एक महत्त्वपूर्ण असे मोजमापन आहेत. GDP च्या आधारे देशाच्या सीमारेषेच्या आत उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचे बाजार मूल्य किती आहे

 

जर आपल्या देशात उत्पादित होत असलेल्या वस्तू जास्त असल्यातर देशाचा विकास झाला आहे असे समजावे. कारण देशात उत्पादित झालेल्या वस्तूंच्या विक्रीतून देशात जास्त पैसा येतो. त्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती चांगली राहते.

 

देशाची आर्थिक परिस्थिती ही सकल देशांतर्गत उत्पादन अंतर्गत मोजण्यात येत असते. देशाची आर्थिक स्थिती ही प्रत्येक तीन महिन्यानंतर मोजण्यात येत असते. कृषी, उद्योग आणि सेवा यांच्या आधारे देशात GDP मोजता येतो. या मध्ये सेवा क्षेत्र, शिक्षण, आरोग्य, बँकिंग, संगणक इत्यादींचाही सरकारने सकल देशांतर्गत उत्पादनांमध्ये समावेश केला आहे.  आपल्या भारत देशात वर्षातून चार वेळा जीडीपी मोजण्यात येतो. ठराविक काळामध्ये एका देशात उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवा यांचा खर्च म्हणजे gdp.

 

हे नक्की वाचा:- शेअर मार्केट IPO काय आहे? संपूर्ण माहिती

 

वरील क्षेत्रात उत्पादन वाढ झाल्यास किंवा कमी झाल्यास GDP मध्ये बदल होतो. जिडीपी मोजताना आपल्या भारत देशात उत्पादित झालेल्या सर्व वस्तू विचारात घेतल्या जातात. मग त्या वस्तू भारत देशात विकल्या असो किंवा मग विदेशात उत्पादित झालेल्या असो. परंतु या वस्तू आपल्या भारत देशात उत्पादित झालेल्या पाहिजे. विदेशात उत्पादित झालेल्या आणि आपल्या भारत देशात विकल्या गेलेल्या वस्तूंचा यामध्ये विचारात घेतल्या जात नाही. आपल्या भारत देशात वर्ष 1950 पासून GDP मोजला जात आहे.

 

GDP चे प्रकार किती आहेत? – Types of GDP in Marathi :-

GDP चे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादने व अवास्तव सकल देशांतर्गत उत्पादने असे दोन प्रकार GDP मध्ये पडतात.

 

1. Real Gross Domestic Products (वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादने) :-

 

Real Gross Domestic Products वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादने च्या आधारे देशाच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज हा अचूकपणे लावता येतो. वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादने या आधारे अनेक वर्षांसाठी चे उत्पादन प्रमाण शोधण्यात येते.  या द्वारे GDP ची गणना महागाई नियंत्रित करण्यासाठी सरकार हे आधार वर्ष ठरवीत असते. आधीच्या वर्षाचा विचार करून gdp मोजतात. याला आपण वृद्धी दर सुद्धा म्हणतो.

 

हे नक्की वाचा:- डिमॅट अकाउंट काय आहे? अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती

 

 

2. Unrealistic Gross Domestic Products – अवास्तव सकल देशांतर्गत उत्पादने :-

 

GDP मोजण्याच्या या पद्धतीमध्ये GDP हा सध्याच्या देशात उत्पादनांच्या मूल्यांच्या आधारावर ठरविला जातो. या पद्धतीमध्ये GDP दर हा सध्याच्या वर्तमान वस्तूंच्या किमती द्वारे मोजल्या जातो.

 

 

 

GDP कसा मोजतात? How GDP Calculated information in Marathi:-

 

जीडीपी मोजण्यासाठी लोकांनी वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी केलेला खर्च, सरकारने केलेला खर्च, गुंतवणूक खर्च व निर्यात वाचा आयात या सर्वांचा आधार घेऊन मोजण्यात येतो.  जीडीपी मोजण्यासाठी कृषी क्षेत्र, वीज, खान उद्योग, उत्पादन, बांधकाम, संरक्षण, व्यापार अन्य सेवा तसेच  संरक्षण वरील क्षेत्रातून gdp ची आकडेवारी ठरवली जाते.

 

GDP काढण्यासाठी सूत्राचा वापर केला जातो. GDP काढण्यासाठी खालील सूत्र वापरले जाते.

 

GDP = C + I + G + (X − M)

 

GDP चे सूत्र अर्थ मराठीत:-

 

GDP = खाजगी वापर + एकूण गुंतवणूक + सरकारी गुंतवणूक + सरकारी खर्च + (निर्यात-आयात)

GDP (एकूण देशांतर्गत उत्पादन) = उपभोग + एकूण गुंतवणूक

 

 

जिडीपी च्या सूत्राच्या साहाय्याने GDP मोजमाप करताना व्यक्तीच्या वापरातील अन्न खर्च, भाडे, वैद्यकीय खर्च तसेच नवीन घर यांचा समावेश होत नाही.

 

 

 

GDP द्वारे देश गरीब आहे किंवा श्रीमंत आहे, हे माहीत पडते. GDP देशातील सर्व लोकांवर परिणाम करतो. GDP द्वारे देशाचा आर्थिक विकास देशाची परिस्थिती समजते. देशाचा जीडीपी दर कमी असल्यास देशात उत्पादित होणाऱ्या वस्तूंची संख्या कमी आहे असे समजून देशांतील लोकांचे सरासरी उत्पन्नही कमी असते. जर देशाचा जीडीपी जर हा चांगला असेल तर देशात उत्पादित होणाऱ्या वस्तूंची संख्या जास्त असल्यामुळे देशाचा विकास होत असतो. देशाचा जीडीपी कमी असल्यास देशावरती आर्थिक संकट येत असते. तसेच देशातील जीडीपीच्या आधारे सरकारची ध्येयधोरणे बदलत असतात.

 

 

आजच्या या पोस्ट मध्ये आपण GDP विषयी संपूर्ण माहिती आपल्या मराठी भाषेत समजून घेतली. ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.