प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मुदतवाढ | Extension for PM-GKAY 2022

 

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. संपूर्ण भारत देशात कोरोणा महामारी पसरलेली असताना देशातील कोणताही गरीब व्यक्ती उपाशी राहू नये म्हणून केंद्र शासनाच्या वतीने ही Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana (PM-GKAY) सुरु करण्यात आलेली आहे. या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना मिळणाऱ्या स्वस्त राशन व्यतिरिक्त आणखीन पाच किलो अतिरिक्त धान्य हे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मिळणार आहे. प्रत्येक व्यक्तीस अतिरिक्त पाच पाच किलो धान्य हे मोफत देण्यात येत आहे.

 

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मुदतवाढ | Extension for PM-GKAY 2022

 

 

 

पीएम-जीकेएवाय  अंतर्गत आत्ता पर्यंत एकूण पाच टप्पे पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे आता देशातील गरीब गरजू कुटुंबांसाठी केंद्र शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे. ते म्हणजे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे.Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana (PM-GKAY) Extension 2022

 

हे नक्की वाचा:- रेशन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्याची प्रक्रिया संपूर्ण माहिती

 

आपल्या देशात अनेक गरीब आणि दुर्बल घटक आहेत, अशा घटकांना दोन वेळचे जेवण करण्यासाठी लागणारे पुरेसे धान्य मिळावे यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये ही पंतप्रधान गरीब कल्याण योजना वाढविण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. ही योजना आता आणखीन सहा महिने करिता वाढविण्यात असलेली आहे. आता ही Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana 2022 ही सप्टेंबर 2022 पर्यंत चालणार आहे.

 

हे नक्की वाचा:- रेशन कार्ड लिस्ट मध्ये आपले नाव असे चेक करा ऑनलाईन

 

 

ही योजना एप्रिल 2020 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे, या योजने मध्ये आत्ता पर्यंत पाच टप्पे ही पूर्ण झालेली आहे. या योजनेचा पाचवा टप्पा हा 2022 च्या मार्च महिन्यात संपणार आहे. आणि आता नवीन मंजुरी नुसार सहावा टप्पा हा सुरू करण्यात येत आहे.

 

 

 

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना वर केंद्र सरकारने आता पर्यंत पाच टप्प्यासाठी एकूण 2.60 लाख कोटी रुपये निधी खर्च केला आहे. पुढच्या सहा टप्प्यासाठी या योजने अंतर्गत एकूण 80 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या योजने चा संपूर्ण खर्च हा केंद्र सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे.

 

हे नक्की वाचा:- ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 महाराष्ट्र

 

देशातील स्थलांतरित कामगारांना या योजने अंतर्गत one nation one ration अंतर्गत देशात कुठेही धान्य मिळविता येणार आहे. देशातील एकही गरीब कुटंब उपाशी राहू नये असा या योजने अंतर्गत उद्देश आहे. त्यामुळे या पीएमजीकेएवाय योजनेला आणखीन सहा महिन्यासाठी मुदत वाढ देण्यात आलेली आहे. या योजने मुळे रेशन लाभार्थ्यांना दरवेळी भेटणाऱ्या रेशन पेक्षा दुप्पट धान्य मिळत आहे. ही देशातील एक महत्वपूर्ण अशी योजना आहे, जी लोकांना अन्न सुरक्षा पुरविते. या योजने अंतर्गत  संपूर्ण देशात एकूण, 1003 लाख मेट्रिक टन इतक्या अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे. देशातील गरीब लोकांना अन्न सुरक्षा पुरविणारी ही एक यशस्वी योजना ठरली आहे.

 

असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा.