12th परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध | HSC Board Exam Hall Ticket online download

आपल्या महाराष्ट्र राज्यातील बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे.  जे विद्यार्थी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे  मध्ये शिकत आहेत. अश्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र म्हणजेच (Hall Ticket) मिळणार आहेत. उच्च माध्यमिक परीक्षा इयत्ता १२ वी ची परीक्षा ही मार्च ते एप्रिल मध्ये होणार आहेत. त्यासाठी आता ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत. Hsc online Hall Ticket आता मिळणे सुरू झाले आहेत. How to download 12th hall ticket online in marathi

12th परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध | HSC Board Exam Hall Ticket online download
12th परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध | HSC Board Exam Hall Ticket online download

 

१२वी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट डाऊनलोड कसे करायचे? ( How to download hsc hall ticket online) :-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे  यांच्या हस्ते राज्यातील सर्व शाळा व उच्च महाविद्यालयांना या वर्षी होणाऱ्या 12th exam चे हॉल तिकीट हे ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. हे हॉल तिकीट तुमचे महाविद्यालय तसेच शाळा ह्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करू शकतात. यासाठी तुमच्या शाळा तसेच महाविद्यालयांना त्यांच्या कॉलेज लॉगिन करून ते हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे. विद्यार्थी स्वतः download करू शकत नाहीत. Hsc exam hall tickets download

हे नक्की वाचा:- दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक असे करा डाऊनलोड

संबंधित महाविद्यालयांनी शिक्षण मंडळाच्या https://www.mahahsscboard.in या वेबसाईट वरून १२ वी परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करावे. जर महाविद्यालयांना काही अडचण आल्यास ते शिक्षण मंडळाकडे संपर्क करू शकतात. Maharashtra state board exam hall ticket download online

12th hall ticket बद्दल महत्वाची :-

🛑 १२ वी परीक्षेचे ऑनलाईन हॉल तिकीट हे सर्व  उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रिंट काढून त्यांच्या शाळेत १२ वी मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना द्यायचे आहे.

🛑 जर त्यांच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून  हॉल टिकीट हरवल्यास  तर त्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळा तसेच महाविद्यालय यांच्याकडून पुन्हा प्रिंट काढून मिळणार आहे. त्या हॉल तिकीट वर दुय्यम प्रत असे लीहण्यात येईल.

🛑 विद्यार्थांच्या हॉल तिकीट मध्ये काही चुका किंवा दुरुस्त्या करावयाच्या असतील तर त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालय शी संपर्क साधावा. ते शिक्षण संस्था शिक्षण मंडळात जाऊन तुमच्या दुरुस्त्या करून आणतील.

🛑जर हॉल तिकीट मध्ये फोटो चुकीचं आला असल्यास त्यावर नवीन फोटो चिटकवून शाळा महाविद्यालय यांनी सही शिक्का मारावा.

अश्या पद्धतीने १२ वी च्या विद्यार्थ्याना हॉल तिकीट हे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सर्व बारावी ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना परीक्षेसाठी best of luck…

हे नक्की वाचा:- बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी maha dbt scholarship अर्ज प्रक्रिया