प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना काय आहे लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा?

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना काय आहे व या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना चा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा? मित्रांनो प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेद्वारे (Pradhan mantri Krushi sinchan yojana) शेतकऱ्यांना सिंचनासाठी अनुदान दिलं जाते. या योजनेसाठी तुम्ही अर्ज करु शकता आणि तुमच्या शेतामध्ये सिंचन सुविधांचा पावर करू शकता. ही योजना महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी फार महत्वाची ठरणार आहे.    (Prime Minister Agri Irrigation Scheme) 

Pradhan mantri krushi sinchan yojana. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना म्हणजे काय लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा?

 

ही योजना महाराष्ट्र मध्ये महा डी बी टी पोर्टल द्वारे राबिण्याबाबत येत आहे. महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी आता आधुनिक शेती कडे वळत आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शेतकऱ्यापुढे त्यांच्या शेतीला जलसिंचन करणं हे मोठे आव्हान देणारे काम असते. जर शेतकऱ्याने पारंपारिक पद्धतीनं पाणी दिल्यास इंधन, वेळ आणि पाण्याचा अपव्यय होतो. आपल्या देशामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे शेतीमध्ये सिंचनाच्या ज्या सोयी सुविधा असतात त्यामधे आधुनिक पद्धतींचा वापर व्हावा म्हणून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. शासनातर्फे सिंचन सुविधा मध्ये ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या दोन्ही आधुनिक पद्धतींचा पुरवठा करण्यास वाव देण्यात येत आहे.त्यामुळेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेद्वारे शेतकऱ्यांना सिंचन सुविधांसाठी अनुदान हे देण्यात येत आहे. निश्चितच या योजनेमुळे शेतकऱ्यांकडे सिंचन सुविधा उपलब्ध होऊन शेतकरी समृद्ध होणार आहे.(Prime Minister Agri Irrigation Scheme know how to apply) शेतकरी अगदी सोप्या पद्धतीने मोबाईल किंवा कम्प्युटर च्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता व या योजनांचा लाभ मिळवू शकता.

 

सिंचन सुविधा मध्ये अनेक आधुनिक पद्धती आहे. त्यामध्ये ठिबक सिंचन ही पद्धत महाराष्ट्रात अग्रेसर आहे. या ठिबक सिंचन पद्धती च्या माध्यमातून पिकांना त्यांच्या झाडाच्या मुळाशी लहान लहान नळ्या च्या माध्यमातून थेंबथेंब पाणी देण्याची आधुनिक अशी पद्धत म्हणजे ठिबक सिंचन पद्धत होय. या आधुनिक पद्धतीत जमिनीमध्ये थेंब थेंब म्हणजेच पिकाला आवश्यक तेवढेच पाणी देण्यात येत असते. त्यामुळे पाणी वाया जात नाही आणि पिकाला आवश्यक तेवढेच पाणी मिळते. त्यामुळें पिकाची वाढ चांगली होऊन पिकाची भरभराट होते. मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेंबाने दिले जाते. ठिबक सिंचन या आधुनिक पद्धतीत महाराष्ट्र राज्य अग्रेसर असून संपूर्ण भारतात जेवढे ठिबक सिंचन आहे त्यापैकी ६० टक्के ठिबक सिंचन हे एकट्या महाराष्ट्र राज्यात केले जाते. दुसरे व महत्त्वाचे आधुनिक सिंचन म्हणजे तुषार सिंचन हे एक असे साधन आहे जे शेती पिके, या मध्ये सिंचन करण्यासाठी वापरली जाते. तुषार सिंचन हे एक महत्वाचे साधन आहे. व हे पावसा सारखेच नियंत्रण करून वापरण्यात येत असते. तुषार सिंचन सुविधा सुद्धा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.(Pradhan mantri Krushi sinchan yojana)

 

 

लाभ कुणाला मिळेल व अर्ज कोण करू शकतो :-

या योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा आहे अशा शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. तसेच संबंधित शेतकऱ्याकडे सात बारा उतारा व आठ अ चा उतारा हा असावा. अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती मधील शेतकऱ्यांना प्राधान्य आहे, त्यामुळे संबंधित शेतकऱ्याकडे अनुसूचित. जाती , अनुसूचित जमाती(Sc व st cast मधील लोकांसाठीच) असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे. जर शेतकऱ्याने 2016-17 पूर्वी जर लाभ घेतला असल्यास त्या शेतकऱ्याला पुढील 10 वर्ष लाभ मिळणार नाही, तर शेतकऱ्याने सन 2017-18 मध्ये जर लाभ घेतला असेल तर पुढील 7 वर्ष त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्याच प्रमाणे या योजनांचा ज्या शेतकऱ्याला लाभ घ्यायचा असेल त्या शेतकऱ्याकडे पाणी देण्यासाठी वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेती ची मर्यादा ही 5 हेक्टर आहे. त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. या योजने च्या माध्यमातून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के तर, इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान हे देण्यात येत असते. संबंधित अनुदान शेतकऱ्यांना त्यांची निवड झाल्या नंतर त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असते.

 

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:-

 

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रे लागतात.

१)सात बारा उतारा(७/१२)

२)आधार कार्ड(Uid card)

३)आठ अ दाखला(८/अ)

४)वीज कनेक्शन

५)जातीचा दाखला(sc आणि st कास्ट साठी)

६)खरेदी केलेल्या सिंचन संचाच बील

७)स्वयं घोषणापत्र

८)पूर्वसंमती पत्र

 

इत्यादी कागदपत्रे लागतात.

 

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांना सर्व योजनेचा लाभ हा एकच पोर्टल वरून देण्यात येत आहे. ते पोर्टल म्हणजे MahaDbt Portal आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषी सिंचन योजने अंतर्गत लाभ हा Maha DBT पोर्टल वरून देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम https://mahadbtmahait.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यायची आहे.या वेबसाईट ला भेट दिल्यानंतर त्यांना अर्ज करायचा आहे. त्यांना या पोर्टल वर अनेक प्रकारच्या योजना दिसतील त्यापैकी ही योजना निवडा. आता शेतकऱ्यांनी नवीन युजर वर क्लिक करून नोंदणी करून घ्यायचे आहे. पुढे शेतकऱ्यांनी त्यांचं पूर्ण नाव  टाकावे, युजर नेम आणि पासवर्ड टाकून महाडीबीटीवर नोंदणी करून घ्या  व त्यासाठी  स्वतः चा ईमेल आयडी असणं बंधनकारक असून( पुढील माहिती शेतकऱ्यांना सुलभ रीतीने मिळवण्यासाठी ईमेल आयडी व मोबाईल नंबर स्वतःचा द्या) त्यांचं आणि मोबाईल नंबंरचं व्हेरिफिकेशन करावं लागते. नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करुन अर्ज भरावा लागेल. लॉगीन केल्यानंतर आधार कार्ड क्रमांक टाकून आधार प्रमाणीकरण करुन घ्या. त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांची प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण भरायची आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक माहिती व शेती जमिनीची माहिती भरा त्याचप्रमाणे पिकांचा तपशील भरणे आवश्यक आहे. तुम्ही जी पिके घेता ती पिके या ठिकाणी नोंदवा.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना अर्ज सुरू असा करा अर्ज

शेतकऱ्यांनी यशस्वी रित्या लॉगीन केल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांची संबंधीत सर्व माहिती भरुन एकाच अर्जाद्वारे शासनाच्या विविध असलेल्या योजनांचा लाभ घेता येतो. त्यापैकी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना हा पर्याय निवडायचा आहे. व पुढील पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यापैकी कृषी सिंचन योजना हा पर्याय शेतकऱ्यांना निवडायचा आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना जी योजना हवी आहे त्या हव्या असलेल्या सिंचन प्रकाराचा पर्याय निवडायचा आहे. त्यामधे ठिबक सिंचन, तुषार सिंचन हा कोणताही पर्याय निवडा. सर्व माहिती व्यवस्थिथत भरुन अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करावे.अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला कोणती योजना आवश्यक आहे त्यानुसार तुम्ही प्राधान्य क्रमांक निवडावा. त्यानंतर तुम्ही भरलेल्या अर्जासाठी फी पेड करायची आहे. फी पेड केल्या नंतर तुमचा अर्ज हा यशस्वी रित्या सबमिट होऊन जाईल. व तुम्ही तुमचा अर्ज हा पोर्टल वर मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर जाऊन पाहू शकता. शेतकऱ्यांचा अर्ज मंजुर झाल्या नंतर जर त्यांची निवड झाल्यास शेतकऱ्यांना लाभ मिळेल यासाठी शेतकऱ्यांना कागदपत्रे ही Mahadbt पोर्टलवर अपलोड करावी लागतात. शेतकरी त्यांना हव्या असलेल्या सर्व योजनांसाठी अर्ज करता येतो.(Pradhan mantri Krushi sinchan yojana)

शेतकरी मित्रांनो महाडीबीटी पोर्टलवरुन शेतकरी हे विविध योजनांचा लाभ एकच पोर्टल वरून मिळवू शकता त्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना म्हणजे काय लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा?एकदाच अर्ज करावा लागेल. एक शेतकरी-एक अर्ज या पद्धतीद्वारे एकचं अर्ज करावाचा आहे. त्यामुळे शेतकरी दुसरा अर्ज करू शकत नाही. परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांना पहिला अर्ज रद्द करुन दुसऱ्या सर्व बाबींसाठी पुन्हा नव्यानं एकच अर्ज करता येत आहे. त्यासाठी पहिला अर्ज हा शेतकऱ्यांना रद्द  करावा लागणार आहे. MahaDbt पोर्टल वर शेतकरी कोणत्याही योजनेसाठी अर्ज करू शकता. जर त्यांची चालू आर्थिक वर्षात निवड झाली नाही तर तोच अर्ज पुढील वर्षासाठी सुध्दा गृहीत धरण्यात येतो. व या योजने मध्ये शेतकऱ्याची निवड ही लॉटरी पद्धतीने करण्यात येत असते.

हे सुध्दा वाचा:- महा डी बी टी शेतकरी योजनांची लॉटरी लागली 

मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही maha dbt पोर्टल च्या माध्यमातून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना साठी अर्ज करू शकता व शासनाच्या योजनेचा लाभ घेऊ शकता.

 

मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा.जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील सर्व बांधवांना ही महत्वपूर्ण माहिती मिळेल.