दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना 2021

दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना 2021जमीन खरेदीसाठी 100% अनुदान योजना  कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान या योजनेंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौध्द भूमिहिन शेतमजूरांना जमिनीचे वाटप करण्यात येत आहे. आजच्या या लेखामध्ये आपण दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना विषयी संपूर्ण माहिती पाहत आहोत.

 

Dadasaheb Gayakwad sabalikaran Yojana दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना 2021
दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना 2021

 

 

या योजनेच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना तसेच भूमिहीन व्यक्ती, अनुसूचित जाती तथा नवबौद्ध घटकातील विधवा व परित्यक्त्या महिला यांना त्याच प्रमाणे अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील अत्याचारग्रस्त यांना प्राधान्याने या योजनेचा लाभ देण्यात येत असतो. आणि या योजने अंतर्गत सन 2021 या वर्षा साठी सुधारित तरतुदी पैकी रुपये १२,५०,००,०००/- इतकी तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ही योजना आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे.

या योजने साठी नवीन शासन निर्णय 2021 आला आहे आणि या शासन निर्णयानुसार – या योजनेसाठी नव्याने १२,५०,००,०००/- (अक्षरी रुपये बारा कोटी पन्नास लक्ष रुपये)इतके खर्च करण्यासाठी याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. व या योजनेला आता नवीन बळकटी मिळणार आहे.(Dada Saheb Gaikwad Sabalikaran Yojana) ही योजना आता चांगली राबविण्यात येणार आहे.

दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनाच्या माध्यमातून शंभर टक्के अनुदानावर शेत जमिनीचे वाटप करण्यात येणार आहे. ही योजना 2021 मध्ये नव्याने राबविण्यात येणार आहे. राज्य सरकार तर्फे या योजनेसाठी शंभर टक्के इतके अनुदान देण्यात येणार आहे. दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्य्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर “दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत”

 

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना मध्ये आता २०२१ मध्ये राज्य सरकार मार्फत अनुदान देण्यात येणार आहे. जमीन खरेदी करण्यासाठी आता मिळेल शंभर टक्के अनुदान अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रयरेषेखालील भूमिहीन कुटुंबांसाठी नव्याने जिरायती चार एकर जमिनीसाठी 20 लाख, तर दोन एकर बागायती जमिनीसाठी 16 लाख रुपये इतके अनुदान राज्य सरकार देणार आहे.

या दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना च्या माध्यमातून विधवा आणि परित्यक्ता महिलांना या योजनेसाठी स्वतंत्र घटक मानण्यात आला आहे, आणि त्यांना या दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभ प्राधान्याने दिला जाणार आहे. तसेच या योजनेमध्ये खालील प्रवर्गाला प्राधान्य देण्यात येणार आहे.

त्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती त्याचप्रमाणे समाजातील नवबौद्ध जे घटक आहे त्या घटकातील विधवा व परित्यक्त्या महिला व अनुसूचित जाती/जमाती(Sc/St) कास्ट मधील अत्याचार प्रतिबंधक

या कायद्याअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील अत्याचारग्रस्त व्यक्ती यांना प्राधान्याने या सदर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभ हा देण्यात येणार आहे.

सदर योजना “कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेतील”(Dadasaheb Gayakwad sabalikaran Yojana) मध्ये जे लाभार्थी निवडले असतील ते निवड झालेल्या लाभार्थी प्रतिक्षेत आहे. या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील व त्याच प्रमाणे दारिद्र्य रेषेखालील असलेल्या भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत’ आता महाराष्ट्र शासनाने आमुलाग्र असा बदल केला आहे, आणि आता ही योजना 100 टक्के अनुदानाची करण्यात आलेली आहे.

या सदर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेत(Dada Saheb Gaikwad Sabalikaran Yojana) लाभ घेण्यासाठी विक्री प्रस्तानातील जमांनीबाबत कोणत्याही न्यायालयात बाद सुरु नसाल पाहिजे आणि नसल्याबाबत व विक्री प्रस्तावातील जमीन कुठेही गहाण नसल्याबाबतचे सर्व संबंधित शेतजमीन विक्री करणा-या संबंधीत शेतकऱ्याचे शपथपत्र सोबत जोडावे.

 

त्याचप्रमाणे प्रस्तावातील शेतजमीनीवर जवळच्या परिसरातील प्राथमिक तसेच सहाकारी तसेच कृषी पत पुरवठा सेवा सोसायटीची कुठल्याही प्रकारची सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकी नसल्याबाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र हे अर्जासोबत जोडावे लागते.

त्याचप्रमाणे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्तावातील असलेल्या शेतजमीनीवर परिसरातील जी बँक कृषी पतपुरवठा करते त्या कृषी पतपुरवठा करणा-या बँकेचे कुठल्याही प्रकारीची शकबाकी नसल्याबाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र सोबत जोडावे लागते.

जो जमीन मालक शेत विक्री करत आहे त्या जमीन विक्री करणा-या शेतमालकाने त्यांच्या कुटुंबातील कमीत कमी दोन व्यक्तीचे (उदा, सख्खे भाऊ, सख्खी बहिण, पत्नी, मुले इत्यादी) यांचा शेतजमीन विक्रीबाबत ना-हरकत दाखला किंवा प्रमाणपत्र हे जोडावे लागेल.

जो शेतकरी शेत जमीन विकत आहे त्या शेत जमीन विकणा-याने राशन कार्डची(Ration Card) ची पहिल्या व शेवटच्या पानाची झेरॉक्स जोडावी लागेल.

जी सदर शेत जमीन विकायची आहे त्या विक्रीसाठी प्रस्ताबीत असलेल्या शेतीच्या गावातील शेत जमीनीचे मागील ५ वर्षाच्या खरेदी विक्री दराबाबतचा तलाठ्याकडून अहवाल घेऊन त्या तलाठयाकडुन घेतलेल्या माहिती चा अहवाल जोडावा.

दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना पात्रता:-

सध्या जी जमीन विक्रीसाठी आहे त्या विक्रीसाठी प्रस्तावीत असलेल्या शेत जमीनीवर कोण कोणते पिक घेतेलेले आहे. व त्या शेत जमिनी मध्ये मागील तीन वर्षात घेतलेल्या पिकाचा तलाठी यांनी दिलेला पिक पाहणी अहवाल हा सोबत जोडावा लागतो.

प्रस्तावातील असलेली शेत जमीन ही वाद ग्रस्त नसावी त्याच प्रमाणे ती जमिनिवर कर्ज नसावे त्यामुळे त्या जमिनीवर बिना बोझा, कुळ नसलेली,तसेच वादग्रस्त नसल्याबाबतचे तलाठी यांनी दिलेले प्रमाणपत्र जोडावे.

विक्रीसाठी जी प्रस्तावीत शेतजमीन आहे ती शेत जमीन बुडीत क्षेत्रात येते किंवा नाही हे पाहून तलाठी यांना प्रमाणपत्र मागून ती जोडावे.

सदर प्रस्तावित शेत जमीन ही अनुसूचीत जमातीच्या व्यक्तीकडून मिळाली नसल्याबाबत तसेच ती प्रस्तावित शेत जमीन शासनाकडून मिळाली नसल्याबाबत तसेच ती प्रस्तावित शेत जमीन ही धार्मिक स्थळाची नसल्याबाबत त्याच प्रमाणे ही प्रस्तावित शेत जमीन ही रस्ता पादण मध्ये जाणारी नसल्याबाबत, गायरान शेतजमीन नसल्याबाबत, पुनर्वसन मध्ये जात नसल्याबाबत, कोणत्याही प्रकल्प साठी नाहरकत किंवा अन्य इतर कोणत्याही बाबीकरीता अधिग्रहित किंवा संपादीत झाली नसल्याबाबत किंवा सोक्षण झाला नसल्याबाबत चे तलाठी यांचे प्रमाणपत्र सोबत जोडाचे आहे.

 

दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना योजना अटी व पात्रता:-

या दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्याचे किमान वय हे 18 व कमाल वय 60 वर्षे निश्चित केले आहे.इतके वय पाहिजे.

सदर योजनेचा लाभ घेणारा लाभार्थी हा भूमिहीन किंवा दारिद्र्यरेषेखालील शेतमजूर असायला हवा.

या दादासाहेब गायकवाड योजनेमध्ये परित्यक्ता, विधवा स्त्री यांना प्राधान्य देण्यात येते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महसूल व वन विभागाने ज्यांना गायरान व सिलिंगच्या जमिनीचे वाटप केले आहे, अशा कुटुंबांना सदर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेचा लाभ देण्यात येत नाही.

यापूर्वी या योजनेचा लाभ दिलेल्या संबंधित कुटुंबाला कोणत्याही कारणामुळे जमीन ही कोणत्याही अन्य व्यक्तीला हस्तांतरीत(ट्रान्स्फर) करता येत नाही. तसेच ही शेत जमीन विकता ही येत नाही.

या सदर योजनेतून लाभ मिळालेल्या कुटुंबाला देण्यात येणारे कर्ज हे बिनव्याजी असते तसेच 10 वर्षे इतक्या मुदतीसाठी असणार आहे.

कर्जफेडीची सुरूवात ही कर्ज मंजुर झाल्यानंतर दोन वर्षांनंतर सुरू होणार आहे.

सादर योजनेचा लाभ घेतलेल्या कुटूंबाने विहीत मुदतीत कर्जाची परतफेड करणे बंधनकारक आहे.

संबंधित लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांनी लाभधारकाने जमीन ही स्वत: कसणे आवश्यक असून तसा करारनामा देणे आवश्यक आहे.

सादर योजनेतून लाभ घेण्यासाठी जमीन ही खरेदी करताना प्रती एकरी तीन लाख रूपये एवढ्या कमाल मर्यादेपर्यंत किंवा चर्चेद्वारे खरेदी करण्याची मुभा ही जिल्हयाच्या जिल्हास्तरीय समितीस देण्यात आलेली आहे.

 

दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना अर्जासाठी लागणारी कागदपत्रे:-

 

दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेसाठी खालील कागदपत्रे लागतात.

दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेसाठी करायचा अर्ज हा विहीत नमुन्यात पासपोर्ट फोटो सह भरावा.

अर्जदाराने अनुसूचित जाती या प्रवर्गातील असल्याबाबत जातीचे प्रमाणपत्र(cast certificate) हे जोडावे व त्याच प्रमाणे अर्जा सोबत रहिवाशी दाखला, रेशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, निवडणूक कार्ड प्रत

भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत तहसीलदार यांनी निर्गमित केलेला दाखला इत्यादी सर्व दाखले जोडावे.

व त्याच प्रमाणे मागील वर्षाचा वार्षिक उत्पन्नाचा(income certificate) तहसीलदार यांनी दिलेला दाखला हा जोडावा.

अर्ज दाराचे वय हे ६० वर्षाखालील पाहिजे त्यामुळे अर्जदारांनी वय हे 60 वर्षांखालील असल्याचा वयाचा दाखला किंवा पुरावा हा जोडणे आवश्यक आहे.

दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना प्राधान्य असल्यामुळे लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्याबाबत विहीत प्रमाणपत्र हे अर्जासोबत जोडावे.

शेतजमीन पसंतीबाबत लाभार्थ्यांनी 100 रूपयांच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र हे जोडणे आवश्यक आहे.

योजनेच्या लाभासाठी करायचा अर्ज हा विहीत नमुन्यात संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात सादर करावा लागेल.

 

अशा प्रकारे ही दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना आहे. जर तुम्ही पात्र असाल तर अर्ज करू शकता खालील लिंक वरून अर्ज डाऊनलोड करा.

 

 

अर्ज डाउनलोड करा

 

 

मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना ही महत्वपूर्ण माहिती मिळेल.