चुकीच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर झाल्यास काय करावे मित्रांनो आजचे युग हे डिजिटल युग आहे. आणि आजच्या या डिजिटल युगामध्ये सर्वच गोष्टी ऑनलाइन होत आहे. दिवसेंदिवस आपल्या भारत देशामध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.अगदीं लहानांपासून ते म्हाताऱ्या व्यक्ती जवळ तुम्हाला स्मार्टफोन दिसेल.गेल्या काही दिवसांमध्ये शाळा, कॉलेज, क्लास, ऑफिस कंपन्या सह एक महत्वाची गोष्ट सुद्धा खूप खूप मोठ्या प्रमाणात ऑनलाईन होत आहे ही गोष्ट म्हणजे आर्थिक व्यवहार.आर्थिक व्यवहार दिवसेंदिवस ऑनलाइन होत आहे.
चुकीच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर झाल्यास काय करावे |
तसे जर पाहिले तर आपल्या भारत देशामध्ये काही लोकं ही मागील काही वर्षांपासून असे ऑनलाइन व आर्थिक व्यवहार करत आहेत. आपल्या भारत देशामध्ये ऑनलाईन बँकिंग(ऑनलाइन आर्थिक व्यवहार)अनेक लोकांना सोयीस्कर वाटत आहे.
आणि जी नवीन तरुण पिढी आहे त्या नवीन तरुण पिढीचा कल हा ऑनलाइन आर्थिक व्यवहार करण्याकडे भर आहे. आजच्या तरुण पिढीला त्या जुन्या पद्धतीमध्ये काहीच आवड राहिलेली नाही.ते फोन, लाईटची बिल्स, आँनलाईन शॉपिंग, पैसे ट्रान्स्फर हे सर्वच व्यवहार फक्त काही क्षणात ते घरबसल्या करत आहे.
एटीएम कार्ड, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, गुगल पे, फोन पे, अमेझॉन पे, पेटीएम या ऑनलाइन माध्यमामुळे तर पैसे न वापरता घराबाहेर पडल्यावर सुद्धा काहीच अडचण भासत नाही आपले काम कुठेच अडकत नाही. परंतु हे काम सर्वच जण करेल असे नाही.
काही लोक जुनी आहेत जे मोबाईल तसेच कम्प्युटर सहजपणे वापरू शकत नाही. त्यांना हे ऑनलाइन माध्यमे वापरणे जमत नाही त्यांना या ऑनलाइन व्यवहार पेक्षा रोख स्वरूपाचा व्यवहारच अगदी सोयीचा वाटतो.त्यामुळे हे लोक ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करत नाही.
परंतु २०२०-२०२१ या वर्षामध्ये हे संपूर्ण चित्र बदलले आहे. कोरोना सारख्या महामारी मध्ये लोकांना social distancing राखण्यासाठी सर्व व्यवहार हे ऑनलाइन पद्धतीने करण्यास भाग पाडले आहे. तसेच देशाचे पंतप्रधान यांनी सुध्दा डिजिटल इंडिया ही मोहीम राबविली आहे.त्यामुळे सुध्दा या ऑनलाइन व्यवहाराला चालना मिळाली आहे.
स्वतः जवळ पैसे हाताळणे कमी व्हावे यासाठी पैशाची होणारी देवाण घेवाण हे थांबवणे अत्यंत गरजेचे झाल होते आणि त्यामुळे सगळ्यांनाच हे ऑनलाईन व्यवहार करावे लागले. व इथूनच भारतात ऑनलाइन व्यवहार हे मोठ्या प्रमाणात होऊ लागले.
आता अगदीं ठेलेवला, भाजीवाला, किराणावाल्या पासून सगळ्यांकडेच Google Pay, Paytm, phone pay, Amazon pay सारखी online व्यवहाराची साधने येऊ लागली आहेत. हे सगळ्यांनाच फायद्याचे झाले आहेत.
अशा प्रकारे सर्व पैशांचे online व्यवहार करताना सहसा कोणतीही अडचण येत नाही,या व्यवहारामध्ये म्हणजेच गुगल पे, फोन पे सारख्या mobile Banking च्या व्यवहारामध्ये सरळ मोबाईल नंबर टाकून, ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्याच्या नावाची ओळख करूनच मग ऑनलाइन व्यवहार हा करता येतो. म्हणूनच या प्रकारच्या ऑनलाईन व्यवहारात विशेष अडचणी येत नाहीत.
मोबाईल बँकिंग चे व्यवहार करताना घ्यायची दक्षता:-
या मोबाईल बँकिंग च्या (Google Pay, Paytm, phone pay)सारख्या ऑनलाइन व्यवहार मध्ये तुम्हाला काही दक्षता घ्यावी लागेल जेणेकरून तुमचा व्यवहार सुरळीत होईल आणि तुम्हाला कोणी फसवणार नाही.
१)सर्व प्रथम तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे ट्रान्स्फर करणार आहात त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर ची खात्री करा व नंतर पैसे ट्रान्स्फर करा.
२)तुम्हाला जर कोणी म्हणले की तुमच्या अकाउंट मध्ये पैसे येणार आहे व ते पैसे मिळवण्यासाठी तुमचा upi pin टाका व पैसे तुमच्या अकाउंट मध्ये येईल, असे कधीही करू नका कारण पैसे मिळवण्यासाठी कधीही आपला upi pin टाकायची आवश्यकता नसते.
3)upi pin फक्तं तुम्ही पैसे ट्रान्स्फर करतानाच टाका.
४)तुमचा upi pin वेळोवेळी बदलत रहा.
पॅन कार्ड आधार कार्ड सोबत असे लिंक करा
परंतु लोकांच्या बाबतीत तो NEFT करताना खरा प्रश्न येतो त्यांना NEFT(National Electronic Fund Transfer) mobile Banking च्या तुलनेत neft करताना थोडा फार अडचणीला सामोरे जावे लागू शकते व तुमचे पैसे चुकीच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर होऊ शकतात.
NEFT व्यवहार मध्ये आपल्या बँक अकाऊंट खात्यातून जर कोणाला पैसे पाठवायचे असतील तर त्या व्यक्तीच्या बँकेच्या खात्याचा नंबर व त्याच बरोबर IFSC code व इतर माहिती देखील लागत असते.
त्यामुळे अशा प्रकारच्या NEFT(NATION ELECTRONIC FUND TRANSFER) च्या व्यवहारामध्ये माहितीच्या देवाणघेवानी मध्ये काहीतरी गडबड व्हायची शक्यता असते.
असे एकाध्या वेळेसच होत असेल की आपली बँकिंग डिटेल्स, खाते क्रमांक व ifsc code टाईप करून पाठवताना एकाधे अंक इकडचे तिकडे होण्याची शक्यता असते. किंवा मग एकाद्या वेळेस पैसे पाठवणाऱ्या व्यक्ती कडून नजरचूक सुध्दा होऊ शकते.
समोरच्या व्यक्तीकडून आकडे माहिती टाईप करताना काही अंक बदलले जाऊ शकतात. किंवा घाई गडबडी च्या वेळी पैसे ट्रान्स्फर करणाऱ्या कडून BENIFICERY निवडताना देखील चूक होण्याची शक्यता असते.
थोडक्यात, आपल्या चुकीमुळे किंवा मग पद्धत थोडी किचकट असल्यामुळे या व्यवहार मध्ये चुकी होण्याची शक्यता असते.
मित्रांनो, पैसे चुकीच्या खात्या मध्ये जाण्याचे कारण काहीही असो पण जर तुमच्या कडून चुकीच्या खात्यात अशा प्रकारे पैसे गेल्यावर काय करायचे?
अगदी दोन दिवसा पूर्वीच माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीने आपल्या मुलाला पैसे पाठवण्याऐवजी ते ज्या दुकानातून किराणा आणतात त्यांना पाठवले त्यामुळे त्यांची फार तारांबळ उडाली.
ज्या वेळेस त्यांच्या ही त्यांच्या कडून झालेली चूक लक्षात आली त्यावेळेस त्यांनी त्या किराणा दुकानदाराला कॉल केला व त्यांना हा प्रकार सांगितला तो किराणा दुकानदार सुद्धा त्यांच्या जवळचा होता व चांगला होता म्हणून त्याने त्यांना ती रक्कम परत पाठवली.
परंतु हेच जर किराणा दुकानदार त्यांच्या ओळखीचा नसता तर? किंवा मग त्यांनी हे पैसे कोणत्याही दुसऱ्या अनोळखी व्यक्तीला पाठवले असते तर अशी मोठी रक्कम जर कोणा अनोळखी व्यक्तीच्या खात्यात चुकून गेली तर तुमच्या समोर खुप मोठा लॉस सहन करावा लागेल, तुम्हाला त्या व्यक्तीशी संपर्क करता येईलच असे नाही.
जर तुम्ही तुमचा त्या व्यक्ती बरोबर संपर्क झाला तरी ती व्यक्ती तुमच्या कडून त्याच्या खात्यात पैसे आले हे, सहजतेने मान्य करून पैसे परत करेल याची कोणतीही garanty नाही. त्यातनिही जर तुम्ही तुमच्या ऑफीस चे व्यवहार करत असाल तर तुमची नोकरी सुध्दा जाऊ शकते व तुम्हाला दिवसा तारे दिसायला लागतील.
असे ऑनलाइन व्यवहार(online transaction) करताना नुकसान झाल्यावर काय उपाय असतात हे माहीत करून घेणे फार महत्वाचे आहे.
हेच तुम्हाला या लेखा मध्ये वाचायला मिळणार आहे.
चुकीच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर झाल्यास काय करावे :-
१. जर तुमच्या कडून अशी चूक झाली तर सर्वात पहिल्यांदा तुमच्या बँकेला कळवा तुम्ही फोन करून तुमच्या बँकेला तुमच्या हातून जी चूक झाली आहे, ते कळवा. तुमच्या बँकेला या विषयी माहिती देणे आवश्यक आहे.
यासंबंधी तुम्ही तुमच्या बँकेला ईमेल द्वारे सुद्धा कळवा जेणेकरून तुमच्याकडे तुम्ही बँकेला संबंधीत घटना झाल्यावर बँकेला वेळेतच कलवल्याचा तुमच्या कडे पुरावा राहतो. व भविष्यात तुम्हाला हा पुरावा कमी पडू शकतो.
२. तुम्ही तुमच्या बँकेला कळविल्या नंतर प्रत्यक्षात तुमच्या बँक अधीक्षक ची भेट घ्या.
तुमच्या बँक मध्ये प्रत्यक्षात जाऊन त्यांना सर्व माहिती सांगा व झालेल्या चुकीचे सर्व पुरावे देऊन तुमची कंप्लेंट नोंदवा.
मित्रांनो कोणतेही नेट बँकिंगचे व्यवहार करत असताना कधीही व्यवहार झाल्यावर त्या व्यवहाराचा स्क्रीनशॉट घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही स्क्रीनशॉट काढत नसाल तर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायची आवश्यकता आहे.
३. तुम्ही ज्या बँक खात्यात चुकून पैसे पाठवले आहेत. त्या बँकेत सुध्दा तक्रार नोंदवावी. मग तुम्ही फोन करून तक्रार नोंदवू शकता किंवा लेखी तक्रार नोंदविण्यास बरे राहील.
आणि लेखी तक्रार करत असताना तक्रारीच्या शेवटी तुमचे पैसे तुम्हाला वापस मिळावेत याची सुध्दा नोंद करा मागणी करा.
तुम्ही केलेल्या सर्व लेखी तक्रारीं चे पुरावे तुमच्याजवळ जपून ठेवा व बँकेला दाखवा असे केल्याने ती बँक मदत करू शकेल.
तसेच तुमच्या कडून ज्या बँक अकाऊंट धारकाच्या खात्यात चुकीने पैसे जमा झालेले आहेत त्याला पैसे परत करण्यासाठी विनंती ही बँक करू शकते जेणेकरून तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील.
४. वरील सर्व गोष्टी केल्या नंतर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकते परंतु ज्याच्या खात्यात चुकीने पैसे गेले आहेत त्या व्यक्तीने पैसे परत करायला नकार दिला तर? तुम्ही काहीही करू शकत नाही, अशा वेळेस तुमच्याकडे एकच पर्याय आहे तो म्हणजे पोलिसात तक्रार दाखल करणे. म्हणजेच तुम्ही लिगल अँक्शन घेऊ शकता.
५. या संदर्भात तुमची बँक सुद्धा पोलिसात व आवशकता पडल्यास कोर्टात देखील लेखी तक्रार करून तुम्हाला मदत करू शकते. ते तुमच्या बँकेवर निर्भर आहे.
भारतीय रिझर्व बँकेच्या असलेल्या नियमानुसार असे प्रकार झाल्यास तुम्हाला पैसे परत मिळवून द्यायची जबाबदारी ही तुमच्या बँकेची सुद्धा आहे.या साठी बँकेकडून आवश्यक ती मदत जरूर घ्यावी. बँकेने नकार दिल्यास तुम्ही RBI कडे सुध्दा तक्रार नोंदवू शकता.
मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कडून चुकीच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर झाल्यास उपाय करू शकता. पण मुळात अशा प्रकारची चूक होऊच नये यासाठी तुम्ही काळजी घेणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.
१. जर तुम्ही नेट बँकिंग ने व्यवहार करत असाल तर व्यवहार करताना अत्यंत काळजीपूर्वक करा. जर तुम्ही घाई गडबडीत असाल तर शक्यतो ऑनलाइन व्यवहार करणे टाळा. ज्या वेळेस तुम्ही रिकामे असाल त्या वेळेस शांततेने हे ऑनलाइन व्यवहार करा.
२. आँनलाईन व्यवहार करत असताना सर्व माहिती अत्यंत काळजीपूर्वक भरा. पैसे ट्रान्स्फर करण्यापूर्वी एकदा माहिती तपासून घ्या व मगच व्यवहार करा.
३. जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मोठ्या रकमेचे व्यवहार करत असाल तर विशेष काळजी घ्या. जेणेकरून उचित घडणार नाही, मोठी रक्कम पाठवण्यापूर्वी सर्वात अगोदर त्याच खात्यात त्यातील काही थोडी रक्कम अगोदर पाठवा नंतर तुम्हाला खात्री झाल्या नंतर उरलेली रक्कम ट्रान्स्फर करा.
४. तुम्ही केलेल्या सर्व व्यवहारांचे स्क्रीनशॉट काढून ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या सर्व व्यवहारांचे स्क्रीनशॉट काढून ठेवा.
मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाइन व्यवहार करताना दक्षता घेऊ शकता तसेच चुकीच्या बँक खात्या मध्ये पैसे ट्रान्स्फर झाल्यास परत मिळवु शकता.
हे वाचा:- ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर फसवणुकीपासून वाचवतील या 5 गोष्टी