नवीन विहिरी साठी अर्ज करा पोक्रा योजनेतून

नवीन विहिरी साठी अर्ज करा पोक्रा योजनेतून मित्रांनो आपण या लेखामध्ये pocra योजने  अंतर्गत (नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प) नवीन विहीरी योजनेची माहिती घेणार आहोत. या योजनेे मध्ये असे शेतकरी सहभागी होऊ शकतात जे ग्राम कृषि संजिवनी समितीने मान्यता दिलेले. ग्राम कृषी संजीवनी गावा मध्ये कार्यरत असते.या योजनेच्या माध्मातून तुम्ही ऑनलाईन अर्ज करून नवीन विहिरी साठी १००% इतके अनुदान मिळवू शकता.ही शासणा मार्फत राबविण्यात येणारी अत्यंत महत्वाची योजना आहे.या योजनेला नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणून सुद्धा ओळखले जाते.या योजनेमध्ये विविध योजनांचा समावेश होतो त्यापैकी आपण नवीन विहीर योजना विषयी संपूर्ण माहिती पाहत आहोत. Navin vihir yojna

 

नवीन विहीर योजना ऑनलाईन अर्ज करा pocra योजने अंतर्गत
नवीन विहीर योजना ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

नवीन विहीर  योजना ऑनलाईन अर्ज करा pocra योजने अंतर्गत:

 

 

 

आवश्यक कागदपत्रे पाहा:-required documents for pocra yojna maharashtra)

 

१)सातबारा (7/12)

२)8अ उतारा

३)ग्राम कृषी संजीवनी ची मान्यता

 

 

 

 

लाभार्थी पात्रता काय आहे? What is Beneficiary Eligibility for pocra yojana?  :-

 

१. विहीर घेण्यासाठी एकूण जमिनीचे क्षेत्र ०.४० हेक्टर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.या पेक्षा कमी क्षेत्र नको.

 

२. ज्यांच्या कडे आधी पासूनच सिंचनाची सुविधा आहे तसेच या घटकाचा इतर कोणत्याही योजनेतून यापूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही.

 

३. प्रस्तावित तुमची नवीन विहीर जेथे तुम्हाला या योजनेचा लाभ घेऊन नवीन विहीर बांधायची आहे ते ठिकाण व पिण्याच्या पाण्याचा सार्वत्रिक स्त्रोत या मधील अंतर ५०० मीटर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.या पेक्षा कमी अंतर नको.

 

४. प्रस्तावित नविन बांधत असलेली विहीर जेथे तुम्हाला या योजनेचा लाभ घेऊन नवीन विहीर बांधायची आहे ते ठिकाण व अस्तित्वात असलेल्या इतर विहिरींचे अंतर १५० मीटर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. या पेक्षा कमी नको.

 

५. गावा मध्ये अस्तित्वातील व प्रस्तावित असे एकूण सिंचन विहिरींची असलेली घनता ही लागवडी योग्य असणाऱ्या क्षेत्राच्या ८ विहिरी प्रति चौरस किलोमीटर इतकी असणे आवश्यक आहेत.

 

६. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचे असलेले प्रमाणपत्र आवश्यक आहेत.हे प्रमाणपत्र तुम्हाला आणायचे आहे.

 

७. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणे ने जे नियम ठरवून दिलेले आहे त्या नियमा प्रमाणे किंवा त्यांच्या असलेल्या व्याख्येप्रमाणे अतिशोषित व शोषित पाणलोट क्षेत्र असलेल्या भागात विहिरी घेण्यास मनाई आहेत. त्यामुळे अतिशोषित व शोषित पाणलोट क्षेत्रामध्ये विहिरी मिळत नाही.

 

८. नवीन विहीर खोदणे व अन्य बाबींची पूर्तता करण्यासाठी कमाल १ वर्षाचा कालावधी अनुज्ञेय आहे.या कालावधीत विहिरीचे काम पूर्ण करावे लागेल.

 

 

 

 

अनुदान किती अनुदान किती आहे :-

विहीर बांधण्यासाठी १०० टक्के अनुदान आहे, रुपये २.५० लाख. अनुदान थेट लाभार्थीच्या आधार कार्ड संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येते.त्यामुळे आधार कार्ड सोबत बँक अकाउंट लिंक असावा.या योजनेसाठी तुम्ही अर्ज करून नवीन विहीर खोदू शकतात. ही एक शासनाची अत्यंत महत्वपूर्ण योजना आहे. navin vihir yojna maharashtra, pocra vihir yojna, Vihir Anudan Yojana, नविन विहीर योजना

 

ऑनलाईन अर्ज कुठे करावा?

 

इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी https://dbt.mahapocra.gov.in या (संकेत स्थळावर वेबसाईट वर) जाऊन ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. त्यानंतर तुम्हाला पूर्व संमती मिळेल.पूर्व संमती मिळाल्या नंतर विहिरीचे काम चालू करायचे आहे.अधिक माहिती साठी जवळच्या कृषी अधिकारी यांच्याशी भेटा.

 

Pocra योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुमचा जिल्हा Pocra योजनेत समाविष्ट असणे आवश्यक आहे.

 

Pocra योजना पूर्व संमती मिळणे सुरू:-

 

ज्या शेतकरी बांधवांनी पोक्रा योजना अंतर्गत अर्ज केले होते, अश्या शेतकऱ्यांना पूर्व संमती मिळणे सुरू झाले आहे. ज्या शेतकरी बांधवांना पूर्व संमती मिळालेली आहे , अश्या शेतकऱ्यांना आता योजनेतील कामे पूर्ण करून ऑनलाईन पद्धतीने बिल अपलोड करायचे आहे. त्यानंतर कृषी विभागाच्या माध्यमातून अनुदान लाभार्थ्यांचे बँक खात्यात थेट ट्रान्स्फर करण्यात येणार आहे. Pocra yojna अंतर्गत शासनाच्या वतीने या योजने च्या अमलबजवणी करिता अनुदान वितरित करण्यात आलेले आहे. Pocra yojna maharashtra 2022

 

ज्या शेतकरी बांधवांची पोक्रा योजना करिता निवड झालेली आहे, अश्या शेतकरी बांधवांनी mahadbt pocra हे अँप डाऊनलोड करून त्यामध्ये चेक करू शकतात. तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांना एसएमएस आलेला असेल.