या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 30 नोव्हेंबर पर्यंत कृषी अवजारांसाठी अर्ज करता येणार | Agricultural Implements

जिल्हा परिषद कृषी विभागाअंतर्गत जिल्हा परिषद उपकर योजना राबवण्यात येते व याच अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी अवजारांची उपलब्धता करून देण्यात येते त्यामध्ये अनुदानावर अवजारे शेतकऱ्यांना देण्यात येते व सन 2023-24 या वर्षासाठी शेतकऱ्यांना कृषी अवजारे अनुदानावर हवी असतील तर 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज शेतकऱ्यांना भरता येणार आहे.

जालना जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद उपकर योजनेअंतर्गत 30 नोव्हेंबर पर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी अवजारे अनुदानावर हवी असेल तर अर्ज करावे, अशा प्रकारचे आवाहन करण्यात आलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने पूर्ण करावी लागेल, तसेच शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पादन दीड लाखांपर्यंत आहे तसेच स्वतःच्या नावावर शेती आहे, अशा शेतकऱ्यांना जिल्हा परिषद उपकर योजनेअंतर्गत अर्ज करता येईल.

जिल्हा परिषद उपकर योजना अंतर्गत 50 टक्के अनुदानामध्ये शेतकऱ्यांना कृषी अवजारांची उपलब्धता करून देण्यात येते तसेच शेतकऱ्यांना यामध्ये, बिना विद्युत मोटार कडबा कुट्टी, पेरणी यंत्र, पलटी नांगर, विहिरीवरील पंप सेट, पेरणी यंत्र, मिनी ट्रॅक्टर अशा विविध प्रकारच्या कृषी अवजारांची उपलब्धता 50 टक्के अनुदानामध्ये शेतकऱ्यांना करून देण्यात येते.

त्यामुळे जिल्हा परिषद उपकर योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना अर्ज करायचे असेल असे शेतकऱ्यांनी 30 नोव्हेंबर पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे. त्यामधून योग्य शेतकऱ्यांची निवड करून 50 टक्के अनुदानामध्ये कृषी आवजारांची उपलब्धता शेतकऱ्यांना करून देण्यात येईल.

अर्ज कोण करू शकतो?

जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहे.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 30 नोव्हेंबर पर्यंत कृषी अवजारांसाठी अर्ज करता येणार | Agricultural Implements

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील 10 दिवसात होणार पिक विम्याचे वाटप