सध्याच्या स्थितीमध्ये कांद्याच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र आहे, गेल्या काही दिवसापासून थोड्या थोड्या प्रमाणामध्ये कांद्याच्या दरात सुधारणा होत आहे, या आधी मात्र कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात खालावलेले होते सामान्य नागरिकांना हे दर परवडणारे होते परंतु व्यापाऱ्यांना दरात सुधारणा व्हावी अशा प्रकारची आशा होती व त्यांची आशा आता पूर्ण होताना दिसत आहे, कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
रविवारला गोळे कांद्याला मिळालेला दर 625 रुपये प्रति दहा किलो एवढा होता, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठवून आहे अशा शेतकऱ्यांना आनंद व मोठे समाधान मिळत आहे कारण कांद्याच्या दरात वाढ झालेली शेतकऱ्यांना फायदा होत आहे, परंतु हे शेतकरी प्रत्येक वेळेस कांद्याचे उत्पादन घेतात परंतु यावेळेस मात्र कांदा उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांकडून निराशा व्यक्त केली जात आहे.
कांद्याचे निर्यात मूल्य वाढवल्यानंतर कांद्याचे दर स्थिर झालेले असताना मात्र ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कांदा दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे तसेच आळेफाटा या प्रसिद्ध ठिकाणी, शुक्रवारला सातशे रुपये प्रति दहा किलो कांद्याला दर मिळालेला आहे अशा प्रकारचा उच्चांक कांदा पिकाला मिळालेला आहे.
या सर्वांमधून मात्र सामान्य नागरिकांना डोळ्यांना पाणी आणणारा व खिशाला झळ देणारा कांदा बनलेला आहे त्यामुळे कांद्याचा वापर सामान्य नागरिकांकडून आटोक्यात आणण्याचा प्रयत्न पुढील काही दिवसात असेल व कांद्याच्या दरात वाढ झाली मात्र शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत आहे.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील 10 दिवसात होणार पिक विम्याचे वाटप