राज्यशासना अंतर्गत झालेल्या बैठकीमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या वाटपाबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, व त्यानुसार अतिवृष्टी नुकसान भरपाई मध्ये वंचित राहणारे सर्व शेतकरी या निर्णयामुळे अतिवृष्टी नुकसान भरपाई करिता पात्र ठरणार आहे.
राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मुळे नुकसान झालेले होते त्यामध्ये जुलै महिन्यात सुद्धा नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसाठी राज्य शासना अंतर्गत नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती, परंतु शेतकरी जर एकाच गावातील असतील तर त्यामध्ये सुद्धा तफावत जाणून येत होती, त्यामध्ये एकाच गावातील शेतकरी काही नुकसान भरपाईसाठी पात्र म्हणजेच त्यांना नुकसान भरपाई देण्यात येत होती परंतु काही शेतकऱ्यांना यामधून वंचित व्हावे लागत होते.
नुकसान भरपाई वितरित करत असताना एचडीआरएफ निकषानुसार, तीन हेक्टर ची मर्यादा तसेच अतिवृष्टीचे अनुदान दुप्पट करण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला होता, तसेच त्यावरील 2023 ची नुकसान भरपाई असेल तर दोन हेक्टर पर्यंतच्या मर्यादेमध्ये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झालेला होता परंतु यामधून दोन हेक्टर च्या मर्यादेमुळे अनेक शेतकरी यामधून वंचित राहत होते.
राज्य शासना अंतर्गत 31 ऑक्टोबर 2023 रोजी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे व त्यानुसार नुकसान भरपाई च्या अटीमध्ये दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टरची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे ज्या शेतकऱ्यांचे शेत्र पाच एकरापेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांना अर्थातच दिलासा मिळणार आहे.
जर पूर परिस्थिती किंवा अतिवृष्टीमुळे शेती खरडून गेलेली असेल तर त्यामध्ये पिकाची नुकसान भरपाई किंवा नुकसान झालेले असेल तर त्याची नुकसान भरपाई यापैकी कोणत्याही एकाची नुकसान भरपाई देण्यात येत होती परंतु, आता मात्र शेतकऱ्यांना दोन्हीकडे सुद्धा लाभ देण्यात येईल. त्यामुळे अर्थातच शेतकऱ्यांसाठी चा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासना अंतर्गत घेण्यात आलेला आहे.
कांद्याच्या किमतीने घेतली भरारी, दरात प्रचंड वाढ, काय आहे सर्व सामान्यांची स्थिती