राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिलेली आहे, त्यामुळे शेतकरी पावसाची वाट बघत आहे, त्यामुळे राज्यात पाऊस येणार की नाही हा मोठा प्रश्न उपस्थित होतो, शेतातील पिकाला पाण्याची आवश्यकता असल्याने बळीराजा चिंतित झालेला आहे, हवामान विभागाने नवीनच अंदाज वर्तवलेला आहे, त्यानुसार राज्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये येत्या 24 तासात विजांच्या कड कडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
राज्यामध्ये जुलै महिन्याच्या 25 तारखेपासून पावसाने खंड दिला, वातावरणामध्ये गेल्या काही दिवसात जास्त प्रमाणात उष्णता बघायला मिळाली, तसेच पावसाळा उशिरा सुरू झाल्याने व पाऊस येत नसल्याने दुष्काळ पडतो की काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार एक ते दोन दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवलेली आहे
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यांमध्ये काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे, पुढील 24 तासांमध्ये मुंबई,कोकण,ठाणे शहरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. राज्यातील इतर भागांमध्ये म्हणजेच विदर्भामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे व काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस राज्यामध्ये काही भागात मुसळधार पाऊस होणार आहे, त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र मध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. शेती पिकाला जीवनदान देणारा हा पाऊस शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार आहे.
महाराष्ट्रात तब्बल 2109 जागांची कृषी विभागात कृषी सेवक भरती, असा करा अर्ज