कापसाच्या भावामध्ये तेजी आलेली आहे, दिवसेंदिवस कापसाची आवक कमी होत असताना कापसाच्या भावांमध्ये सुधारणा होत आहे, परंतु कापूस दरामध्ये होणारी सुधारणा त्याचा फायदा खूप कमी शेतकऱ्यांना मिळणार आहे, कारण आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी कापूस विकलेला आहे, खूप कमी शेतकऱ्यांकडे कापसाची साठवणूक केलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापर्यंत कापसाचे साठवणूक केलेली आहे अशा शेतकऱ्यांसाठी मात्र एक अत्यंत आनंदाची बातमी आहे.
राज्यातील एका बाजार समितीमध्ये कापसाला उच्चांक पातळीमध्ये भाव मिळालेला आहे, तसेच राज्यात अनेक ठिकाणी कापूस खरेदी बंद झालेली आहे, तर काही ठिकाणी फक्त काहीच दिवस कापूस खरेदी चालू राहणार आहे, राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, कापूस खरेदी बंद होणार होती परंतु आता खरेदी 19 ऑगस्ट पर्यंत चालू असणार आहे.
कापसाला 12 ऑगस्ट रोजी प्रति क्विंटल प्रमाणे 7435 ते 7835 तर सरासरी भाव 7825 रुपये एवढा मिळाला. तसेच दहा तारखेला मिळालेला भाव सरासरी 7780 रुपये एवढा होता. गेल्या काही महिन्यांमध्ये कापसाने नीचांक पातळी गाठलेली होती व त्यादरम्यान अनेक शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केलेली होती परंतु आता मात्र कापूस उच्चांक पातळी गाठत असताना दिसत आहे. कापसाची वाटचाल 8000 चा टप्पा पार करण्याकडे होत आहे.
राज्यामध्ये सुरुवातीला कापूस साडेनऊ हजार रुपये होता परंतु कापूसने नीचांक पातळी गाठून साडेसहा हजार रुपये पर्यंत जाऊन पोहोचलेला होता,व आताचा कापसाचा दर बघितला असता कापसाच्या दरामध्ये खूप चांगल्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कापूस आहे अश्या शेतकऱ्यांनसाठी कापसाबाबतची महत्त्वाची अपडेट होती.
शेतकऱ्यांनो अलर्ट व्हा! सातबारा खरा की बनावट, अशा पद्धतीने ओळखा