Agriculture Servant Recruitment : महाराष्ट्रात तब्बल 2109 जागांची कृषी विभागात कृषी सेवक भरती, असा करा अर्ज

महाराष्ट्रामध्ये कृषी विभागाअंतर्गत कृषी सेवक भरती केली जाणार असून, कृषी सेवक भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवार इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज करू शकणार नाही. केली जाणारी भरती एकूण 2109 जागांची आहे. तसेच विविध विभागामध्ये पदे भरली जाणार आहे.

उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर त्यांची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे, जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी परीक्षेचे केंद्र देण्यात येणार आहे, त्या ठिकाणी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षा द्यावी लागेल. त्यामुळे पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 फी,मागासवर्गीय 900 रुपये एवढी असणार आहे.

अर्ज करणारा उमेदवार कृषी विद्यापीठातील पदवी,डिप्लोमा किंवा समतुल्य, किंवा शासनमान्य संस्था, अशा शैक्षणिक पात्रतेने पूर्ण असायला हवा. तसेच उमेदवाराची वयोमर्यादा 19 ते 35 वर्षे या वयोगटातील असावी. मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची वयोमर्यादेत सूट देण्यात आलेली आहे

वेगवेगळ्या विभागानुसार पदसंख्या भरल्या जाणार आहे, त्यामध्ये नागपूर विभागामध्ये 448, अमरावती विभागात 227, कोल्हापूर 250, लातूर 170, पुणे 294, छत्रपती संभाजी नगर 196, नाशिक 448, ठाणे 294 म्हणजेच एकूण 2109 जागांची एकूण भरती केली जाणार आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे.

Agriculture Servant Recruitment : महाराष्ट्रात तब्बल 2109 जागांची कृषी विभागात कृषी सेवक भरती, असा करा अर्ज

भरतीची जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

Agriculture Servant Recruitment : महाराष्ट्रात तब्बल 2109 जागांची कृषी विभागात कृषी सेवक भरती, असा करा अर्ज

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment