पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केलेली होती, देशामध्ये विश्वकर्मा योजना चालू करण्यात येणार आहे. कामांमध्ये गुंतलेल्या कारागिरांना कर्ज उपलब्ध व्हावे या उद्देशाने पीएम विश्वकर्मा योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे. योजने करीत एकूण 5 वर्षासाठी 13 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करत असताना पीएम विश्वकर्मा योजना घोषित केलेली होती व विश्वकर्मा जयंती निमित्त लवकरच योजना चालू करण्यात येणार आहे.
विश्वकर्मा योजनेअंतर्गत देशातील अनेक कारागिरांना लाभ घेता येणार आहे, त्यामध्ये मासे जाळे विणणारे, फुल विक्रेते कारागीर, धोबी, गवंडी, शिल्पकार, कुंभार, लोहार,लॉकस्मिथ यांना योजनेमध्ये लाभ घेता येणार आहे तसेच या सर्व नागरिकांचे योगदान ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे यांना पुढे ठेवून केंद्र सरकारने घेतलेला विश्वकर्मा योजनेचा निर्णय खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
विश्वकर्मा योजनेअंतर्गत एकूण पाच वर्षासाठी 13 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे, योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये कारागिराला 1 लाख रुपयांचे कर्ज देण्यात येईल व त्या कर्जावर 5 टक्के व्याज असणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यांमध्ये कारागिराला दोन लाख रुपये पर्यंत सवलतीचे कर्ज देण्यात येईल.
कारागिरांना अधिक कौशल्य विकसित करता यावे या उद्दिष्टाने नवीन प्रकारची उपकरणे व डिझाईन ची माहिती मिळावी या उद्देशाने, आधुनिक उपकरणे यांची खरेदी करण्यासाठी मदत दिली जाणार आहे. योजना आर्थिक वर्ष 2023-24 ते आर्थिक वर्ष 2027-28 त्या पाच वर्षासाठी एकूण 13000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे घोषित करण्यात आलेली योजना कारागिरांसाठी उत्तम ठरणार आहे.