शेतकऱ्यांच्या जमिनीत संबंधी अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र म्हणजेच सातबारा आहे, जमीन कोणाच्या नावावर आहे हे ओळखण्याचे उत्तम साधन म्हणजेच मुख्य सातबारा असतो. फक्त जमीन नावावर आहे असे बोलून चालत नाही तर, कुठेही जमीन नावावर आहे याचा पुरावा मागतो तर पुरावा म्हणून जमिनीसंबंधी सातबारा दाखवावा लागतो, परंतु आज काल जमिनीचे बनावट सातबारा सुद्धा दाखवण्यात येते व लोकांची फसवणूक होते. अशा वेळेस काय करावे? बनावट सातबारा कसा ओळखावा?
बनावट सातबारा संबंधित आतापर्यंत अनेक प्रकारची प्रकरने उघडीस झालेली आहे, बोगस सातबारा दाखवून जमिनीची विक्री करणे व्यक्तीच्या नावावर बोगस सातबारा उतरविणे, अशा प्रकारच्या आणि घटना घडलेल्या आहे परंतु अशा घटनांना आता आळा घालायला हवा, अनेकांनी तर बोगस सातबाराच्या जोरावर बँकेकडून कर्ज देखील काढलेली आहे. अशांवर कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे परंतु यापुढे अशा प्रकारची प्रकरने घडू नये या कारणाने बनावट सातबारा ओळखण्याच्या काही पद्धती आहे.
बनावट सातबारा ओळखण्याची पद्धत
सातबारा बनावट आहे की खरा हे ओळखण्यासाठी, अत्यंत साधी पद्धत आहे, शेतकऱ्यांना आता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा सातबारा उपलब्ध होतो, डिजिटल होत चाललेल्या या युगामध्ये ऑनलाइन पद्धतीने सातबारा काढून शेतकरी सातबारा उतार आहे की बोगस हे ओळखू शकतात कारण ऑनलाईन पद्धतीने काढलेल्या सातबारा उताऱ्यावर, क्यू आर कोड दिला जातो जर क्यूआर कोड दिलेला असेल तर तो क्यू आर कोड स्कॅन करून सातबारा दिसू शकतो जर सातबारा स्कॅन केल्यानंतर सातबारा दिसला तर तो ओरिजनल असेल, परंतु किंवा कोड नसेल तर मात्र तो सातबारा बनावट आहे असे समजावे.
सातबारा उताऱ्यावर तलाठ्याची सही असते त्यामुळे, कधीही सातबारा वर तलाठ्याची सही आहे की नाही हे बघावे, तसेच गेल्या काही वर्षांपासून सातबारा डिजिटल स्वरूपाने मिळत असल्याने, त्यावर सही सुद्धा डिजिटल स्वरूपाची असते, तलाठ्याची सही असल्यास तो सातबारा ओरिजिनल असतो परंतु सही नसेल तर तो डुप्लिकेट आहे असे समजावे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा सातबारा संबंधित व्यवहार करत असताना डिजिटल स्वरूपात काढलेला सातबारा घ्यावा व त्यावरून ओरिजनल आहे की नाही हे तपासून घ्यावे.
अरे बापरे महावितरणने आणली नवीन सिस्टीम, आधी रिचार्ज करा मगच वीज वापरायला मिळणार