आपल्याला आपल्या संपत्ती विषयी संपूर्ण माहिती असली पाहिजे, बऱ्याच लोकांना आपल्या संपत्तीबद्दल फारशी माहिती नसते आणि याच कारणामुळे काही लोक अश्या माहिती नसलेल्या लोकांच्या संपत्ती वर नजर ठेवून असतात. वेळ प्रसंगी हे लोकं संपत्ती साठी वाद निर्माण करतात आणि अशा माहिती नसलेल्या लोकांची फसवणूक करतात. आणि ह्या भोळ्या लोकांच्या जमिनी लुबाडत असतात. जमिनीच्या वादामुळे अनेक ठिकाणी भांडणे मारका देखील होत असतात. त्यामुळे जर तुम्हाला तुमची जमीन सुरक्षित ठेवायची असेल तर जमिनी विषयी संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते. कारण की अर्धवट माहिती असल्यास तुम्ही तुमच्या हक्काची जमीन देखील गमवू. शकाल. आजच्या या लेखामध्ये आपण एका महत्वपूर्ण विषयावर माहिती पाहणार आहोत तो विषय म्हणजे आजोबांच्या जमिनीवर नातवाला किती अधिकार आहे! परिवारातील आजोबांच्या मालमत्तेवर नातवाला तसेच प्रत्येक सदस्याला किती अधिकार असतो?
आपल्या पूर्वजांच्या जमिनीचे किंवा संपत्तीचे वाटप करणे म्हणजे एक किचकट प्रक्रिया असते. कारण की पूर्वजांना अनेक वारस असतात. त्यामुळे प्रत्येक जण आपला आपला अधिकार सांगत असतो. त्यामुळे पूर्वजांच्या जमिनी ह्या खऱ्या व्यक्तीला मिळाल्या पाहिजे. या विषयी अपुरी माहिती असेल तर तुम्हाला तुमची जमीन ही मिळणे कठीण होऊन जाईल. कारण की पूर्वजांच्या जमिनी मिळविण्यासाठी अनेक जण कोर्टाची पायरी चडून त्यांच्या महत्वाचा वेळ आणि पैसा वाया घालवत असतात.
हे नक्की वाचा:- जमीन नावावर करण्यासाठी लागणार आता फक्त १०० रुपये
आजोबांच्या मालमत्तेवर नातवाचा किती हक्क असतो?:-
आजोबांच्या मालमत्तेवर नातवाचा किती हक्क असतो हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल तर याचे उत्तर असे आहे की, नातू किंवा नातीचा त्यांच्या आजोबांच्या मालमत्तेवर पूर्ण अधिकार असतो. मग यामध्ये त्यांचे वडील हयात असेल तरी सुद्धा. नातवाच्या संपत्तीच्या बाबतीत नातवाच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या मृत्यूशी संबंध नसतो. नातू किंवा नात चा जन्म होताच ते त्यांच्या आजोबांच्या जमिनीचे एकप्रकारे हक्कदार बनत असतात.
आजोबांची वडिलोपार्जित मालमत्ता यामध्ये संपत्तीचा वाटा कसा केला जातो? :-
वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे आपले पूर्वज यांच्याकडून वारस हक्कानुसर मिळत असलेली जमीन असते. वडिलोपार्जित जमीन मध्ये आपले स्वतःचे वडील तसेच आपले आजोबा तसेच आपले पंजोबा इत्यादींचा समावेश हा होत असतो. ह्यांच्याकडून मिळणारी संपत्ती ही वारसा हक्काने मिळत असते कारण की हे आपले पूर्वज आहेत. यांच्या मालमत्तेवर आपला अधिकार हा आपण जन्मतःच मिळत असतो. जमिनीचा जो मूळ मालक असेल त्यांच्या मृत्यू झाल्यास त्यांच्या वारस दार यांना त्यांची जमीन मिळत असते.
हे नक्की वाचा:- शासकीय पद्धतीने जमीन मोजणी अर्ज कसा करायचा?
वडिलोपार्जित संपत्तीवर मालमत्तेचा वाटा कसा केला जातो:-
आपल्या वडिलोपार्जित मालमत्तेवर प्रत्येक मुळ वारसदारांना वाटा असला तरी सुद्धा आधीच्या पिढीचा संपत्तीचा वाटा हा आधी विचारत घेतला जात असतो आणि नंतर पुढच्या पिढीसाठी वाटा हा विभागून देण्यात येत असतो. म्हणजे आपल्या आजोबांच्या किंवा पंजोबच्या जमिनीवर नातवंड यांचा वाटा विचारात घेतल्यास सुरुवातीला पंजोबा ची मुले नंतर त्यांची सुद्धा मुले असतील नंतर त्यांची मुले म्हणजे या ठिकाणी प्रत्येक चुलत भाऊ हा आजोबांच्या मालमत्तेचा काही प्रमाणात हक्कदार ठरत असतो.
वडिलोपार्जित संपत्तीवर सर्व नातवंडांचे हक्क कसे असतात? :-
आपल्या वडिलोपार्जित संपत्तीवर प्रत्येक नातवंड यांना समान अधिकार असतो. जर जमीन वाद हा पंजोबा किंवा खापर पंजोबा यांच्या मालमत्तेचा असेल आणि या मध्ये त्या पंजोबा ला आता अनेक नातू हे वारसदार असतील अश्या वेळेस जर नातवाने नातवाच्या नातवाला मालमत्तेतील हिस्सा देण्यास नकार दिल्यास जमीन कायद्यातील अधिकार नुसार कुणालाही वाट्या पासून वंचित ठेवता येत नसते.
आजोबांच्या स्वतः कष्टाने कमविलेल्या मालमत्तावर अधिकार कसा असतो:-
आजोबांनी मालमत्ता ही स्वतः कष्ट करून विकत घेतली असेल तर अशा आजोबांनी विकत घेतलेल्या मालमत्तेवर नातवाला जो जन्म होताच वारसा हक्काने अधिकार मिळत होता, तो इथे लागू होत नाही. इथे नातवाचा अधिकार नसतो. जर ती जमीन आजोबांनी त्यांच्या मुलाच्या म्हणजे नातवाच्या वडिलांच्या नावावर केली असल्यास त्यावरच म्हणजेच वडिलांच्या मालमत्तेवरच नातवाच्या हक्क असतो.
अश्या वेळेस आजोबा यांच्या मालमत्तेवर नातू थेट दावा करू शकत नाहीत. ती जमीन किंवा मालमत्ता आजोबा कुणालाही देऊ शकतात.
हे नक्की वाचा:- आता 1980 पासूनचे जुने सातबारा उतारा व फेरफार पहा ऑनलाईन
जर आजोबा हे मृत्यूपत्राशिवाय मरण पावले तर अश्या वेळेस आजोबा यांच्या मालमत्तेवर त्यांची स्वतःची पत्नी, मुलगा आणि मुलगी यांचाच हक्क असेल. या ठिकाणी नातवंड यांना हकक मिळत नाही. या मालमत्तेवर दुसर कोणीही वाटा मिळवून घेऊ शकत नाही. कारण ती जमीन वैयक्तिक मालमत्ता त्यांच्या स्वताच्या वारसदार जसे की पत्नी, मुलगा आणि मुलगी यांनाच मिळत असते.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा….