कर्ज माफी 50,000 अनुदान खात्यात जमा, शेतकऱ्यांची यादी जाहीर | Karj Mafi 50,000 Anudan Yojana Maharashtra

 

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना 50000 प्रोत्साहन पर रक्कम देण्याचा निर्णय घेतला व त्यानंतर प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या पन्नास हजार अनुदान याद्या लागल्या होत्या. 50,000 योजना यादी मध्ये ज्या शेतकरी बांधवांची नावे आली होती. अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर रक्कम जमा करण्यात आलेली आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण पन्नास हजार अनुदान योजना संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.

 

कर्ज माफी 50,000 अनुदान खात्यात जमा, शेतकऱ्यांची यादी जाहीर | Karj Mafi 50,000 Anudan Yojana Maharashtra
कर्ज माफी 50,000 अनुदान खात्यात जमा, शेतकऱ्यांची यादी जाहीर | Karj Mafi 50,000 Anudan Yojana Maharashtra

 

 

50,000 अनुदान खात्यात जमा

कर्जमाफी योजनेअंतर्गत 50 हजार अनुदान योजना यादी मध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून केलेले होते, अशा शेतकरी बँकांच्या कर्ज खात्यामध्ये आता 50000 अनुदान ची रक्कम जमा करण्यात आलेली आहे. त्या संबंधित एसएमएस लाभार्थी शेतकऱ्यांना प्राप्त झालेले आहेत.

 

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई नवीन याद्या जाहीर

पन्नास हजार अनुदान योजनेअंतर्गत जर तुमच्यावर चाळीस हजार कर्ज असेल किंवा साठ हजार कर्ज असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये रकमेपर्यंत लाभ देण्यात येतो. यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पन्नास हजार अनुदानाची रक्कम शासनाच्या वतीने जमा करण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यातील ही रक्कम जमा करण्यात आलेली असून लवकरच दुसऱ्या टप्प्यातील 50000 अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

 

50,000 अनुदान शेतकऱ्यांना वितरित

पन्नास हजार अनुदान योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 50000 अनुदानाची रक्कम जमा करण्यात आलेली आहे, ती रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने 50 हजाराची प्रोत्साहन रक्कम कर्जाची वसुली करण्याकरिता कपात करू नये असे निर्देश दिलेले आहे. म्हणजे शासनाच्या वतीने 50 हजाराच्या देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन रकमेमधून बँकांना कर्जाची परतफेड करता येणार नाही, ती रक्कम शेतकऱ्यांना वितरित करावी लागतील. त्यामुळे जर तुमचे 50 हजार अनुदान योजना यादी मध्ये नाव असेल, तर ज्या बँकेकडून तुम्ही कर्ज घेतलेले होते त्या बँकेमध्ये जाऊन तुमची पन्नास हजाराची अनुदान रक्कम काढून घेऊ शकतात.

 

हे नक्की वाचा:- 50,000 अनुदान यादीत नाव न आल्यास, हे काम करा.

महत्त्वपूर्ण असे पन्नास हजार अनुदान योजना संदर्भातील छोटेसे अपडेट आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेतलेले आहे. ही माहिती सर्व शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा.