गाय गोठा अनुदान योजना अर्ज सुरू, अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस व आवश्यक कागदपत्रासह संपूर्ण माहिती | Gay Gotha Anudan Yojana 

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी जोडधंदा म्हणून शेळीपालन, म्हैस पालन, गाय पालन अशा विविध प्रकारचे जोडधंदे करतात, अशा स्थितीमध्ये जनावरांना राहण्यासाठी गोठ्याची आवश्यकता असते, त्यामुळे शासनाच्या माध्यमातून योजना राबवल्या जातात, त्यातील एक योजना म्हणजे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना होय, ही योजना रोजगार हमीच्या अंतर्गत राबवली जाते, या योजनेच्या माध्यमातून पशुपालकाला गोठ्याचा अर्ज केल्यानंतर व संमती मिळाल्यानंतर अनुदान दिल्या जाते, व त्या अनुदानामधून पशुपालक आपल्या पशू साठी गोठा तयार करू शकतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील देण्यात आलेली संपूर्ण प्रोसेस पशुपालकाने पूर्ण केल्यास अर्थातच त्यांना गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ घेता येईल.

 

गाय गोठा अनुदान योजनेचा अर्ज करण्याची प्रोसेस

 

अर्जाचा नमुना घेऊन अर्ज पूर्ण भरून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करावा, अर्जाचा नमुना खालील प्रमाणे देण्यात आलेला आहे त्यासोबत कागदपत्रे ही खालील प्रमाणे देण्यात आलेली संपूर्ण जोडावी, त्यानंतर तुम्ही दिलेल्या अर्ज रोजगार सेवकाच्या माध्यमातून पंचायत समितीमध्ये जाऊन तिथून पुढे जाऊन त्या ठिकाणी तुमचा अर्ज प्रस्ताव मंजूर केल्यानंतर तुम्हाला गाय गोठा अनुदान योजना अंतर्गत प्रस्ताव मंजूर झालेल्या असल्याचा पुरावा देण्यात येईल व अशाप्रकारे तुम्हाला गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ अत्यंत सहजरित्या घेता येईल.

 

अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे

 

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • ग्रामपंचायत शिफारस प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक

 

अर्जाचा नमुना

 

अशी संपूर्ण कागदपत्रे अर्ज करत असताना अर्ज सोबत जोडणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे वरील प्रमाणे देण्यात आलेला अर्जाचा नमुना डाऊनलोड करून अर्ज भरून ग्रामपंचायत मध्ये जमा करावा अशा पद्धतीने गाय गोठा अनुदान योजनेची अर्ज प्रक्रिया वरील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

केंद्र शासनाच्या या योजनेअंतर्गत बेरोजगारांना महिन्याला 5 हजार रुपये मिळणार, जाणून घ्या काय आहे योजना कसा करायचा अर्ज