केंद्र शासनाच्या या योजनेअंतर्गत बेरोजगारांना महिन्याला 5 हजार रुपये मिळणार, जाणून घ्या काय आहे योजना कसा करायचा अर्ज | PM internship Scheme

शासनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात असतात, त्यामध्ये बेरोजगार तरुण, शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, महिला, शेतकरी वर्ग अशा विविध नागरिकांसाठी देशांमध्ये योजना राबवल्या जातात, व आपण बघतच आहोत की देशामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे, त्यामुळे शासनाच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहे, त्यातीलच एक योजना म्हणजे पीएम इंटर्नशिप योजना होय. या योजनेच्या माध्यमातून देशातील बेरोजगार तरुणांना दरमहा 5 हजार रुपये दिले जाईल.

 

या योजनेच्या माध्यमातून जर बेरोजगार तरुणांना लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करून लाभ घ्यावयाचा आहे. व या योजनेचा कालावधी हा बारा महिन्याचा असून बारा महिने पाच हजार रुपये प्रति महिना याप्रमाणे बेरोजगार तरुणांना रोजगार म्हणून असे इंटर्नशिप द्वारा पैसे दिले जाईल. एवढेच नव्हे तर इंटर्नशिप झाल्यानंतर सुद्धा 6 हजार रुपये अनुदान दिले जाईल.

 

Pm internship scheme eligibility

 

  • बेरोजगार तरुणांना योजनेच्या माध्यमातून लाभ घ्यायचा असल्यास काही बाबींमध्ये पात्र असणे गरजेचे आहे त्यामध्ये वयाची बाब महत्त्वाची आहे.

 

  • अर्ज करू इच्छिणाऱ्या बेरोजगाराचे वय 21 ते 24 वर्ष दरम्यानची असावी, त्यामुळे ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे 21 वर्षा खालील वय किंवा 24 वर्षावरील वय असेल तर बेरोजगार तरुण पात्र ठरविल्या जाणार नाही.

 

  • त्याचप्रमाणे घरातील उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असावे, घरातील इतर कोणतीही व्यक्ती शासकीय नोकरी करत नसावी.

 

  • शैक्षणिक पात्रतेमध्ये दहावी, बारावी, आयटीआय, ग्रॅज्युएट अशा सर्व तरुणांना इंटर्नशिप अंतर्गत लाभ घेता येईल.

 

अशाप्रकारे बेरोजगार तरुणांना प्रति महिना 5 हजार रुपये एवढी रक्कम मिळू शकते, त्यामुळे तुम्ही जर बेरोजगार असाल, व तुम्हाला सुद्धा इंटर्नशिप स्कीम अंतर्गत लाभ घ्यायचा असेल,तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही सुद्धा या स्कीम अंतर्गत बारा महिन्यासाठी पाच हजार रुपये मिळू शकता.

 

कर्ज मिळण्यास सुरुवात, आधी मिळेल 1 लाख नंतर मिळेल 2 लाख रु, जाणून घ्या कोणती आहे योजना