राज्यामध्ये यावर्षी ऑगस्ट महिन्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची शेती पिके मोठ्या पाण्याच्या अभावाने बाधित झालेली होती अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी याकरिता पीक विमा अग्रीम मिळावी याकरिता सतत प्रयत्न चालू होते व याच प्रयत्नांना आता झालेले आहे राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आलेली आहे.
राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये अग्रीम पीक विम्याची रक्कम जमा करण्यात यावी याबाबतचे आदेश काढण्यात आलेले होते व त्यानुसार 24 जिल्ह्यांमध्ये 8 नोव्हेंबर पासून जमा करण्यात येत आहे. तसेच अग्रिम पीक विम्याची रक्कम वितरित करण्यात येईल याकरिता 1954 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आलेले आहे व या रकमेमधून शेतकऱ्यांना अग्रीम पीक विम्याची वाटप करण्यात येत आहे.
राज्यामध्ये एकूण अर्जांपैकी आत्तापर्यंत 47,63,000 अर्ज मंजूर करण्यात आलेली आहे तसेच,1954 कोटी रुपयांच्या रकमेपैकी शेतकऱ्यांना आतापर्यंत 965 कोटी रुपयाची रक्कम वाटप करण्यात आलेली आहे, तसेच उर्वरित असलेली 989 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा करण्यात येईल.
अशाप्रकारे राज्यामध्ये पडलेला पावसाचा खंड यामुळे शेती पिकाचे झालेले नुकसान थोड्या प्रमाणात भरून काढता येईल याकरिता शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळावा म्हणून अग्रिम पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल.