प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्ज सुरू केले जातात व यावेळेस बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी एकूण 120 आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी ची कारवाई केली जात आहे, बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे व इच्छुक असणाऱ्या नागरिकांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करून आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत लाभ घेता येईल.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत असलेले 645 आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत असून, 434 आपले सरकार सेवा केंद्राची निवड करण्यात आलेली आहे. उर्वरित असलेले 120 आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याबाबतची कारवाई केली जात आहे. आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्ज करताना काही बाबी लक्षात घेणे गरजेचे असते व त्या बाबी खालील प्रमाणे देण्यात आलेल्या आहेत.
जर उमेदवार पूर्वीपासून सीएससी सेंटर धारक असेल तर अशा उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. सीएससी सेंटर धारक अथवा सीएससी सेंटर साठी पात्र असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. पूर्वीपासून ज्या गावांमध्ये अथवा केंद्रामध्ये सीएससी सेंटर आहे अशा ठिकाणी सीएससी सेंटर साठी अर्ज ग्राह्य धरन्यात येईल.
उमेदवारांना अर्ज भरताना एम एस सी आय टी प्रमाणपत्र, तसेच उमेदवाराची चरित्र प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे, दहा बाय दहा स्क्वेअर पुढची मालकी हक्काची किंवा भाडे तत्वाची जागा असली पाहिजे. कोणकोणत्या तालुक्यामध्ये,गावामध्ये रिक्त जागा आहे याची माहिती संबंधित खालील दिलेल्या जीआर मध्ये देण्यात आलेली आहे.
अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम खालील दिलेल्या जाहिरातीवर क्लिक करून त्यामध्ये शेवटी अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे, त्याची प्रिंट काढून त्यावर दिलेला अर्ज संपूर्ण योग्य प्रकारे लिहावा.
अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रे जोडने गरजेचे आहे त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, संगणक किंवा एमएससीआयटी प्रमाणपत्र, दहावी किंवा इतर शिक्षण घेतल्यास त्याबद्दलचे शैक्षणिक पुरावा, जागा स्वतःची असल्यास सातबारा भाडेपत्त्याची असल्यास जागेचा फोटो, अशा प्रकारची सर्व कागदपत्रे अर्जा सोबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा करावा.
जाहिरात बघण्यासाठी व अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा