PM Kisan New Registration : पी एम किसान योजनेची नवीन नोंदणी, मिळणार वार्षिक 12 हजार रुपये

केंद्र शासना अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे वितरण 27 जुलैला करण्यात आलेले आहे, तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या तर्फे पीएम किसान योजनेची नवीन नोंदणी करणे चालू आहे, परंतु शेतकरी नवीन नोंदणी करत असताना काही शेतकरी त्यामध्ये पात्र ठरवले जात नाही तर काही शेतकऱ्यांना नोंदणी कशी करायची हा प्रश्न पडलेला आहे? पी एम किसान योजनेचा चौदावा हप्ता वितरित झाल्यानंतर, नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना एक प्रकारचे आवाहन करण्यात आलेले आहे की नवीन नोंदणी करते वेळेस, शेतकऱ्यांनी आपले तलाठी अधिकारी यांच्याकडे आपण पीएम किसान योजने करीता नोंदणी करण्यास पात्र आहोत की नाही याची तपासणी करून घ्यावी व नंतरच अर्ज करावा.

तसेच राज्यातील जे शेतकरी पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र आहे असे शेतकरी नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र ठरणार आहे, त्यामध्ये पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची एकूण संख्या म्हणजेच 85 लाख 66 हजार शेतकरी आहे, तसेच पीएम किसान योजनेअंतर्गत आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे सुद्धा आवाहन करण्यात आलेले आहे.

 

पी एम किसान योजना नोंदणी प्रोसेस

 

पी एम किसान योजनेची नवीन नोंदणी करण्यासाठी pmkisan.gov.in या पोर्टलवर यायचे आहे.

त्यानंतर New registration या ऑप्शन वर क्लिक करा, तुम्ही ग्रामीण भागातील अथवा शहरी भागातील शेतकरी असाल तर तेथील ऑप्शन सिलेक्ट करा.

त्यानंतर महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा तुमचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक बॉक्समध्ये टाका. कॅपच्या कोड टाकून सेंट ओटीपी वर क्लिक करा

मोबाईलवर ओटीपी आल्यानंतर ओटीपी च्या बॉक्स मध्ये ओटीपी टाका. त्यानंतर आधारचा डाटा घेऊन नवीन पेज ओपन होईल.

तुम्ही ज्या जिल्ह्यातील आहात तो जिल्हा तालुका व नंतर ब्लॉक निवडून तुमच् गाव निवडा, त्यानंतर कॅटेगिरी निवडा.

त्यानंतर लँड रजिस्ट्रेशन आयडी टाका, त्यानंतर तुमचा रेशन कार्ड नंबर टाका. तुमची जमीन सिंगल आहे की जॉईंट आहे हे निवडा.

त्यानंतर ऍड बटनावर क्लिक करून तुमच्या जमिनी संबंध संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरा. व ॲड बटणावर क्लिक करून तुम्ही ची माहिती भरलेली आहे ती पुन्हा एकदा चेक करा.

डॉक्युमेंट या ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे, तुम्हाला सातबारा अपलोड करावा लागेल.

सातबारा अपलोड केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा आधार नंबर हाच तुमचा रजिस्ट्रेशन आयडी म्हणून दाखवण्यात येईल म्हणजेच तुमची नोंदणी पूर्ण झालेली आहे.

PM Kisan New Registration : पी एम किसान योजनेची नवीन नोंदणी, मिळणार वार्षिक 12 हजार रुपये

तुमचे घर, जमीन तसेच दुकान यांची नोंदणी व कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने बघण्याची संपूर्ण प्रोसेस